अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५ सुरु आहे. अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळीराजा मोफत वीज जाहीर केल्यानंतर ४५ लाख शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे मत व्यक्त केले. सर्वाधिक म्हणजे १६ हजार मेगावॅट वीज कृषीला देणार महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.
डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व शेतकऱ्यांना वीज ही सोलरच्या माध्यमातून दिली जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांना दिवस ३६५ दिवस वीज मिळणार आहे. कोणालाही रात्री पिकाला पाणी सोडण्याची गरज पडणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. १ कोटी ३४ लाख ग्राहकांना मोफत घरगुती लाईट देणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
2030 पर्यंत 52 टक्के वीज ही अपारंपारिक उर्जेतुन असणार आहे. डेटा सेंटर ज्यांच्याकडे आहे तो सर्वात श्रीमंत आहे. त्यांना सर्वात महत्वाची वीज आहे. त्यांना वीज देण्याचा प्रयत्न केला जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. दरवर्षी विजेचे दर 9 टक्के वाढत असतात. 1 लाख 13 हजार कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विजेचे भाव कमी होत जाणार आहेत. पाच वर्षात 24 टक्क्यांनी विजेचे दर कमी करत आहेत. 95 टक्के घरगुती विजेत दिलासा देणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. स्मार्ट मिटर लावला तर दिवसा 10 टक्के वीज बिलावर रिबीट येणार असल्याचेही ते म्हणाले.
हे ही वाचा:
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची निराशा; २१०० रुपयांसाठी अजून वाट पाहवी लागणार