spot_img
spot_img
Wednesday, October 4, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

चित्रा वाघ यांनी २८ प्रमुख विरोधी पक्षांचा उल्लेख केला ‘घोटाळेबाज’

देशातील २८ प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची मोठ बांधली आहे. दिल्ली आणि बंगळूर येथील दोन बैठकानंतर आता मुंबईत इंडिया आघाडीची तिसरी बैठक होत आहे. शिवसेना ( उद्धव ठाकरे ) या बैठकीचे आयोजक आहेत.

देशातील २८ प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची मोठ बांधली आहे. दिल्ली आणि बंगळूर येथील दोन बैठकानंतर आता मुंबईत इंडिया आघाडीची तिसरी बैठक होत आहे. शिवसेना ( उद्धव ठाकरे ) या बैठकीचे आयोजक आहेत. या बैठकीची शिवसेनेने जोरदार तयारी केली आहे. तर, भाजप नेत्यांनी इंडियाच्या बैठकीवर टीका केली. त्यात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही उडी घेतली आहे. इंडिया बैठक ही घोटाळेबाजांची टोळी असल्याची घणाघाती टीका भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्व घोटाळेबाज एकवटले आहेत. एकीकडे प्रामाणिकपणे काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात हा घोटाळेबाजांचा गट आहे. २०२४ मध्ये जनता त्यांना धडा शिकवेल, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांना चारा घोटाळेबाज लालूप्रसाद यादव यांची गरज आहे. लालू प्रसाद यादव यांना कोविड घोटाळेबाज उद्धव ठाकरे यांची गरज भासते. केजरीवाल यांना चिटफंड घोटाळेबाज ममता बॅनर्जीची गरज आहे. ममता बॅनर्जींना दारू घोटाळेबाज केजरीवाल यांची गरज आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे देशातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांचा सम्राट असलेल्या काँग्रेसला या सर्व घोटाळेबाजांची गरज आहे’, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.‘इंडिया आघाडी ही सर्व घोटाळेबाजांची टोळी आहे. त्या घोटाळेबाजांचे उद्योग जनतेला माहित आहेत. देशात ईमानदारीने काम करणारे पंतप्रधान आहेत. तर, दुसरीकडे घोटाळेबाजांची टोळी जमली आहे. ये पब्लिक है सब जानती है’, अशी घणाघाती टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

तर भाजप नेत्याकडून बड्या नेत्यांनाही देखील टीका केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘इंडिया बॉम्बचे बारुद कधीच निघाले आहे. हा बाँब निकामी आहे, त्यांचे अनके नेते दुरावले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह गेला आहे, देशात दिसले पाहिजे म्हणून ते बैठका घेत आहे, यांच्यामागे जनता नाही’, असा टोला लगावला आहे. ‘जे पक्ष या बैठकीसाठी आले आहेत. त्यातील अनके पक्षांकडे एक मतही नाही, हा प्रयोग काही नवीन नाही, यापूर्वीही असे प्रयोग झाले आहेत. त्यांचा कुणी संयोजक नाही. शरद पवार काय किंवा अन्य कुणीही संयोजक झाले तरी काही होणार नाही. ते ह्या डबक्यात कुदतील आणि त्या डब्यात राहतील. हे डब्यात राहणारे लोक आहेत. ते देशव्यापी काहीच करू शकणार नाही’, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.

हे ही वाचा:

राहुल गांधी LIVE : अदानी आणि नरेंद्र मोदी यांचा संबंध काय ???

१८ ते २२ सप्टेंबर या कालवधीत संसदेचं एक विशेष अधिवेशन…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss