Thursday, November 30, 2023

Latest Posts

CM EKNATH SHINDE ON MARATHA RESERVATION:मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे

मराठा आरक्षणाच्या बाबतीत मंत्रिमंडळातील सर्व ३२ नेते मंडळी आणि लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत विस्तृतपणे चर्चा करण्यात आली. कायद्याच्या चौकटीत बसणार आणि टिकणार आरक्षण दिलं पाहिजे, याबद्दल बैठकीत चर्चा करण्यात आली. कायद्याची सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य भूमिका घेणे गरजेचे आहे.मागासवर्ग आयोगाचे युद्ध पातळीवर काम सुरु आहे त्यामुळे मराठा समाजाने संयम राखावा आणि सरकारला थोडा अवधी द्यावा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) यांनी सांगितले. सर्व पक्षीय नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींच्या मतानुसार मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, असे सवार्नुमते सांगण्यात आले. सर्वांनी शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, याबाबत बैठकीत सांगण्यात आले. सुप्रीम कोर्टात रद्द झालेलय गोष्टींची पूर्तता करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

 

हे ही वाचा : 

CM EKNATH SHINDE ON MARATHA RESERVATION:मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे

दिवाळीत मिठाई घेण्यापूर्वी “हे” लक्षात घ्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss