राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू झालेली पाहायला दिसत आहे. तसेच निवडणुकांचा रणसंग्रामही आता जोरदार सुरू झाला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात आज (सोमवार, १८ नोव्हेंबर) संपणार असून आचारसंहिता लागू होणार आहे. सध्या निवडणुकांचा माहोल तापलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीकाटिपण्ण्या करतायेत. अश्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची सभा आज महायुतीच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघातील (Belapur Vidhansabha Constituency) उमेदवार मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांच्यासाठी प्रचारसभा पार पाडली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीसह शिवसेना उबाठा आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला.
ते यावेळी म्हणाले, “लाडकी बहिणी, भाऊ आणि मतदार आहेत सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. बेलापूर मतदरसंघातील माझ्या लाडक्या बहीणीसाठी हा लाडका भाऊ मैदानात उतरला आहे. मंदा म्हात्रेंची हॅट्रिक निश्चित आहे. २३ तारखेला बहुमताने महायुतीचे सरकार येणार.मंदा म्हात्रे या डॅशिंग महिला आहेत. मंदा म्हात्रे या फायर ब्रॅंड लीडर आहेत. त्या नेहमीच आपला आवाज लोकांसाठी वापरत आल्या आहेत, स्वतःसाठी त्यांनी कधी स्वार्थ साधला नाही, मी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला. लाडक्या बहीण, भाऊ, कामगार सगळ्यांनी ठरवलंय कधी २० तारीख येते आणि कधी महाविकास आघाडीला मतदान करतो,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “मी घरात बसणारा मुख्यमंत्री नाही. फेस टू फेस जाऊन लोकांची दुःख ऐकणारा, जनतेचा आवाज ऐकणारा मुख्यमंत्री आहे. काही लोक फक्त टोमणे मारतात, टोमणे मारत मारत अडीच वर्षे घालवली, सगळी कामे रोखली. बाळासाहेब ठाकरे बोलायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो म्हणून शासन आपल्या दारी आणले. ५ करोड लोकांनी याचा फायदा घेतला. सगळी बंद पडलेली कामे सुरु केली. विविध योजना आणल्या, ही देना बँक आहे लेना बँक नाही. तुम्ही ३ हजार ची योजना आणली आता कुठून आभाळातून पैसे आणणार का? महायुतीचा जाहीरनामा काढलाय ये तो सिर्फ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. मला हलक्यात घेऊ नका, हलक्यात घेतला म्हणून टांगा पलटी घोडे फरार झाले. घरी बसणाऱ्यांना सत्ता मिळत नाही. नवी मुंबई महायुतीचा बालेकिल्ला आहे. सर्व शिवसेना, भाजपाला सांगतो कोणी कोणाची दिशाभूल करेल. आमचा कोणालाही सपोर्ट नाही. फक्त मंदा म्हात्रे यांना सपोर्ट आहे. जे जे मंदा म्हात्रे यांनी सांगितलं ते सगळं मी केलं. एकही काम बाकी ठेवलं नाही. जे जे मंदा म्हात्रे मागतील ते पुढच्या ५ वर्षात देणार,” असे ते यावेळी म्हणाले.
हे ही वाचा:
मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…