सरकारशी कोणताही संवाद झाला नसून, त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील मिळाली नाहीत. त्यांच्याकडून कसे उत्तर घायचे यासाठी आणखी दोन-तीन दिवस वाट पाहणार आहे. त्यांना माणुसकी समजत नसेल तर त्यांना उत्तर मराठाच आहे.
दोन दिवसांत आरक्षण मिळणार असल्याचे तानाजी सांवत म्हणत असतील, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन दिवसांत आरक्षण मिळणार असल्याचे का म्हणत नाही. त्यांनी लगेच याबाबत सांगावे, असे जरांगे म्हणाले आहेत.
मिडियाच्या कॅमऱ्यासमोर चर्चा होत नसते, समोरासमोर येऊन चर्चा केली पाहिजे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. यावर बोलतांना जरांगे म्हणाले की, “ त्यांच्या कानात बोळे घातले आहे का? मग मी काल काय म्हणालो होतो. तुम्ही चर्चेला या मराठे तुम्हाला अडवणार नाही असे मी म्हणालो आहे.
पण फक्त एकदाच चर्चा होणार. जोपर्यंत मला बोलता येत आहे, तोपर्यंत चर्चेसाठी यायले पाहिजे. त्यानंतर येऊन काही फायदा नाही. आमचे मराठे तुम्हाला कुठेच अडवणार नाही. आरक्षण द्यायचे की नाही एकदाच येऊन सांगायचे, बाकीची वळवळ करायची नाही, असे जरांगे म्हणाले आहेत.
हे ही वाचा :
नशेत कार चालवणं महिलेला पडलं महागात? तीन जणांना…
Follow Us