तानाजी सावंत यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळालेलं नाही. त्यामुळे तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान, धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्रिपद प्रताप सरनाईक यांना मिळालाय. धाराशिव दौऱ्यावर आले असता प्रताप सरनाईक यांनी तानाजी सावंतांच्या नाराजीवर भाष्य केलं आहे.
प्रताप सरनाईक काय म्हणाले?
प्रताप सरनाईक म्हणाले, राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही ती बदलत असते आदलाबदल होत असते, असं म्हणत तानाजी सावंत यांच्या नाराजीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी भाष्य केलंय. पहिल्या जिल्हा नियोजन बैठकीला तानाजी सावंत गैरहजर होते. त्यावर नाराजी बाबत आपल्याशी बोलणं झालं नसल्याचं सरनाईकांनी सांगितलं.
पालकमंत्री झाल्यानंतर प्रताप सरनाईकांचा धाराशिवमध्ये पहिला निर्णय
पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईकांनी धाराशिवमध्ये पहिला निर्णय आरोग्य विभागाबाबत घेतलाय. तुळजापुरात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यात पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी पहिला निर्णय आरोग्य विभागाचा घेतल्याने चर्चा सुरु झालीये. धाराशिव जिल्ह्यात आरोग्य विभागाकडे विशेष लक्ष देणार असल्याचंही सरनाईकांनी स्पष्ट केलंय.
हे ही वाचा :
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .