बीड जिल्ह्यात सर्व पक्षीय नेत्यांकडून आणि राज्यभरातील नागरिकांकडून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा शनिवारी काढण्यात आला होता. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणन हत्या करण्यात आली. या प्रकरणाला संताप व्यक्त करत वाल्मिक कराड याला अटक करा आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी या मोर्च्या द्वारे करण्यात आली. वाल्मिक कराड हा फरार आहे. बीड मोर्चा निघाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सीआयडीला दिले होते. आता आज या प्रक्रियेला सुरवात झाली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींची संपत्ती जप्त करण्याची सुरवात करण्यात आली आहे. फरार आरोपींच्या मालमत्तेचा शोध घेण्यास प्रशासनाने सुरवात केली आहे. सुदर्शन चंद्रभान घुले कृष्णा शामराव आंधळे, सुधीर सांगळे अशी फरार असलेल्या आरोपींची नावे आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या हत्याप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून ते अद्याप फरार आहेत. पोलिसांना फरार आरोपींचा शोध घेण्यास अपयश आले आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर आता सीआयडीकडून फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्यास सुरुवात झाली आहे.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका