spot_img
spot_img
Tuesday, October 3, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सौम्य तापाची लक्षणे आढळल्याने त्यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी या सध्या डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. एनएनआयने सूत्रांच्या हवाल्याने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सौम्य तापाची लक्षणे आढळल्याने त्यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी या सध्या डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. एनएनआयने सूत्रांच्या हवाल्याने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. सोनिया गांधी यांना मार्चमध्येही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . मात्र, एका दिवसानंतर जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये त्यांची प्रकृती स्थिर असून ते पूर्णपणे निरोगी असल्याचे सांगण्यात आले.

सोनिया गांधी सध्या राजकारणात सक्रिय दिसत आहेत. नुकत्याच मुंबईत झालेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत सोनिया गांधीही सहभागी झाल्या होत्या. यापूर्वी बंगळुरू येथे झालेल्या विरोधी एकतेच्या बैठकीतही त्या सहभागी झाल्या होत्या. काँग्रेस (Congress) संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ताप आल्यानं सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीतील (Delhi News) सर गंगाराम रुग्णालयात (Sir Ganga Ram Hospital) त्यांना दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वीही त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यामध्ये तापाची सौम्य लक्षणं आढळून आली आहेत. सध्या त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सोनिया गांधी नुकत्याच मुंबईत झालेल्या इंडियाच्या (I.N.D.I.A) बैठकीत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते. यापूर्वी मार्चमध्येही सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळीही त्यांना ताप येत होता. तापाच्या तक्रारीनंतर त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्या बऱ्या होऊन ती घरी परतल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा त्यांच्यामध्ये तापाची सौम्य लक्षणं आढळली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे ही वाचा:

राज ठाकरे यांनी साधला फोनवरून आंदोलकांशी संवाद

राज ठाकरे यांचं पुढचं लक्ष बारामती! लवकरच घेणार…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss