spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

हा विजय महायुतीचा नसून ईव्हीएमचा: Vijay Wadettiwar

Maharashtra Election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. यावरून आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

विजय वडेट्टीवार यांनी आज (सोमवार, २५ नोव्हेंबर) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “महाराष्ट्रात नवं सरकार पुन्हा शेतकरी, महागाई, बेरोजगारी वाढली यावर काय करते ते बघू, विरोधक म्हणून आम्ही भूमिका पार पाडू. हे सरकार जनतेने निवडून दिले आहे का? हा प्रश्न जनता टाहो फोडून विचारत आहे, त्याचं उत्तर मिळणं अपेक्षीत आहे. २०१४ मोदी लाट असताना ४२ जागा काँग्रेस जिंकले, आता फक्त १६ जागा जिंकल्या, सरकार विरुद्ध जनमत असताना इतक्या कमी जागा असा प्रश्न जनता विचारत आहेत,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “लाडकी बहीण नावाने पाच टक्के मतं फिरली असतील पण अजून काय घडले यावर अभ्यास आणि विचार करावा लागेल. असे कसं झालं हा प्रश्न महाराष्ट्रात जनता विचारत आहे. पुन्हा मागे जाण्याचा प्रश्न नाही, ज्यांना अपेक्षा नव्हती असे माणसं निवडून आली आहेत. काही लहान राज्य देऊन मोठी राज्य घ्यायचे असे भाजपचे सुरू आहे. हा विजय भाजप महायुतीचा नसून ईव्हीएमचा आहे. कोण कितीही दावा केला तरी विजय ईव्हीएमचा असून ईव्हीएमला हार घालून विजय साजरा करावा,” असे ते म्हणाले.

“शेतकरी संकटात होता, सोयाबीन कापूस विकला जात नाही, पीक विमा मिळाला नाही, अवकाळी, अतिवृष्टी पैसे मिळाले नाहीत, महागाई वाढली असे प्रश्न असताना सरकार विरुद्ध राग असताना सुद्धा अशा प्रकारचा निकाल येतो तेव्हा लोकांसमोर प्रश्न निर्माण होतात. त्याचे समाधान आणि उत्तर याची वाट बघू.. शेवटच्या टप्प्यात महायुतीत तिन्ही पक्षात वाद होता, उलट महाविकास आघाडीत वाद नव्हता, एकत्र काम करत होतो. आम्ही सामूहिक लढलो पण हा निकाल धक्कादायक आहे, निर्णय न पचण्या सारखा आहे,” असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

हे ही वाचा:

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: मुंबईतील विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर

Aditya Thackeray यांचे निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह; म्हणाले, “महाराष्ट्राने मतदान केलंय की…”

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss