Tuesday, June 6, 2023

Latest Posts

संसदेच्या नवीन इमारतीच्या उदघाटनावरून वाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. या संसद भावनाच्या उदघाटनावरून नविन वादंग निर्माण होण्याची संभवता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. या संसद भावनाच्या उदघाटनावरून नविन वादंग निर्माण होण्याची संभवता आहे. मात्र या सोहळ्यावरून बरेच राजकारण रंगताना देखील दिसत आहे. प्रत्येक राज्यातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. तर सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरुन या सोहळ्याला हजेरी लावायला हवी. हे ही तितकाच खरं आहे. आपल्या देशाचे संसद हे लोकशाहीचा पाया आहे. त्यामुळे यावरून राज्याराज्यांत कोणतेही वाद निर्माण होऊ नये.

लोकशाही भावनेने मी आणि माझा पक्ष या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होणार आहे असं मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी म्हटलं आहे. तर बहुतांश विरोधी पक्षांनी या वास्तूचे उद्धाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करावे, पंतप्रधानांच्या हस्ते नाही असा सूर काढला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सत्ताधारांनी आणि विरोधकांनी एकत्र येऊन आपल्या संसदचे उदघाटन शांतपणे करणे गरजेचे आहे. तर अनेकांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे. परंतु असेही काही विरोधी पक्ष आहेत जे NDA चे भाग नसतानाही वास्तू उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

तर या सोहळ्यासाठी काही पक्ष देखील आवर्जून उपस्थित राहणार आहे. तर काही राजकीय पक्ष हे आडकाठीपणा करत असल्याचं बघायला मिळत आहे. पंजाबमधील राजकीय पक्ष अकाली दल सहभागी होणार आहे. त्याशिवाय ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बीजू जनता दल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा YSRCP पक्षही उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असणार आहे. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यादेखील नवीन संसद भवनाच्या वास्तू उद्घाटन सोहळ्याला हजर राहतील. YSR काँग्रेसकडून मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी ट्विट करून सांगितले की, भव्य आणि विशाल संसद भवन राष्ट्राला समर्पित करण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. संसद हे लोकशाहीचे मंदिर असल्याने आपल्या देशाचं प्रतिबंब करते. ही वास्तू देशातील प्रत्येक नागरिकाची आणि प्रत्येक राजकीय पक्षाची आहे. अशा वास्तूच्या उद्धाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकणे हे लोकशाहीच्या भावनेला अनुसरून नसणार आहे. सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरुन या सोहळ्याला हजेरी लावायला हवी. लोकशाही भावनेने मी आणि माझा पक्ष या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होणार आहे असं त्यांनी म्हटलं.

आतापर्यंत १९ विरोधी पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. या पक्षांमध्ये काँग्रेस, द्रमुक (द्रविड मुनेत्र कळघम), आप, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), समाजवादी पक्ष, सीपीआय, जेएमएम, केरळ काँग्रेस (मणी), विदुथलाई चिरुथाईगल काची, आरएलडी, टीएमसी, जेडीयू, NCP, सीपीआय(एम) यांचा समावेश आहे. ), RJD, इंडियन युनियन मुस्लिम लीग, नॅशनल कॉन्फरन्स, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी आणि मारुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम (MDMK). या पक्षणकडून बहिष्कार टाकण्याचे संदेश पसरवले जात आहे. त्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीत नवीन वाद निर्माण होऊन त्यावर जनता आक्रमक होणार नाही हा नव्याने प्रश्न उभा राहिला आहे.

हे ही वाचा:

देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांनी दिले सडेतोड उत्तर

देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना खोचक टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss