Thursday, March 28, 2024

Latest Posts

छगन भुजबळ यांची घणाघाती टीका

देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला . या कार्यक्रमास देशातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.

देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला . या कार्यक्रमास देशातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.नवीन संसद भवनांच्या उदघाटनाकडे भाजप सरकारचे अधिक जास्त लक्ष केंद्रित केले गेले होते. त्यामुळे भाजपसह सोबत अन्य काही पक्ष देखील यावेळी नव्या संसद भवनात उपस्तित होते. मात्र या सोहळ्यावरुन छगन भुजबळ यांनी एक नवीन मुद्दा मांडला.आपल्या देशाला नव्या संसदेची गरज आहे, खासदारांची संख्या वाढवली पाहिजे, नवं संसद भवन बांधलं याविषयी आमचं काहीही म्हणणं नाही. मात्र इतके पुजारी का? असा प्रश्न छगन भुजबळ यांनी मांडला. अशा प्रकारचा सोहळा हा वेगळ्या पद्धतीने करता आला असता. असं म्हणत छगन भुजबळ यांनी या प्रकरणी टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुजारी, मठाधीश यांना संसदेत बोलवून जे काही नव्या संसदेत केलं, पुजारी आणले ते वेदना देणारं आहे. राम मंदिरात, शिव मंदिरात पूजा करणं याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही. पण नवीन संसद हे लोकशाहीचं मंदिर आहे. आपण सर्व धर्मांना, जाती पंथांना एकत्र घेऊन हे चालवणार असं संविधान सांगतं. अशावेळी मोदींनी जे केलं ते जगाने पाहिलं आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. सेंगॉलही एका राजाने दुसऱ्या राजाला द्यायचा असतो. इथे जनताच राजा आहे तरीही सेंगॉलची पूजा करण्यात आली असंही भुजबळ म्हणाले. त्यामुळे छगन भुजबळांचा हा नवीन मुद्दा राजकारणात काय नवीन वाद निर्माण करणार आहे या कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे तर या प्रश्नाला विरोधकांकडून काय प्रतिसाद मिळतोय हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे असणार आहे.

नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यातून राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेते सगळे अदृश्य होते. मग त्या उद्घाटन सोहळ्यास कोण उपस्थित होते? नव्या संसद भवनाच्या सोहळ्यात ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यांना फाटा देऊन अंधश्रद्धा, धर्मकांद यांना महत्त्व देणाऱ्यांचा भरणा होता. असा दावा सामना वृत्तपत्रातून करण्यात आला आहे. विज्ञान, संशोधन न मानणाऱ्या लोकांच्या गराड्यात मोदी आले, त्यांनी धर्मकांड केले. यास हिंदुत्व म्हणाले की राज्याभिषेकाचा सोहळा? हिंदुत्वात श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. भारतीय संसदेचे हे कोणते रुप आपण जगाला दाखवत आहोत? असा प्रश्न सामनातून विचारण्यात आला आहे.

हे ही वाचा:

सावरकर चित्रपटाचा ट्रेझर वरून देवेंद्र फडणवीसांनी केले ट्विट

पुढच्या आठवड्यापर्यंत येणार मान्सून केरळमध्ये; मुख्यमंत्रांकडून आढावा बैठकांना सुरवात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss