बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. या हत्याप्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून बीडचे राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात ६ अरपोपिंना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर मोक्का कायदा लावण्यात आला आहे. वाल्मिक कराड याच्यावरच फक्त खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, वाल्मिक कराडलाही मोक्का लावून त्याच्यावर 302 कलमातंर्गत कारवाई करा, अशी मागणी विरोधक आणि देशमुख कुटुंबीय करत आहे. येत्या काही दिवसांमध्ये या आंदोलनाची धग वाढण्याची शक्यता असल्याने आता बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती बीड जिल्ह्यात 14 तारखेपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी राहणार आहे.
प्राथमिक माहितीनुसार, विविध आरक्षण आंदोलनाची दाहकता लक्षात घेता बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना मोर्चे निदर्शने आंदोलने धरणे करण्यासाठी जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही. बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हे आदेश पारित केले आहेत.
एसआयटी पथकाचे प्रमुख डॉ. बसवराज तेली यांची घेणार भेट
सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे मंगळवारी एसआयटी पथकाचे प्रमुख डॉ. बसवराज तेली यांची भेट घेणार आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना धनंजय देशमुख म्हणाले आम्ही आज तेली साहेबांची भेट घेणार आहोत. खंडणी ते खून प्रकरण यातील ते कटकारस्थान करणारे जे आरोपी आहेत त्यांना मोक्का अंतर्गत कारवाई करून 302 अंतर्गत फाशी लावावी ही माझी मागणी असल्याचे धनंजय देशमुख यांनी म्हटले. या सगळ्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. माझ्या भावाची हत्या ही खंडणीच्या प्रकरणामुळे झाली. त्यामुळे आमची मागणी आहे की, दोन्ही प्रकारणाचे आरोपी एकच आहेत. एसआयटी पथकात आम्ही दोन नावं सुचवली होती. मात्र, त्यांचा अद्याप पथकात समावेश झालेला नाही. नवीन SIT मधील कोणत्याही अधिकाऱ्यावर आमचा आक्षेप नाही, असे धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
अजितदादा….दोषींना शिक्षा देण्यात सरकार अपूर्ण पडले तर…काय म्हणाले Rohit Pawar?
Central Railway चा खोळंबा; उशिराने धावणाऱ्या लोकलमुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी