महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला असून, भाजपचे अनेक उमेदवार निवडून आले आहेत. यातील एक म्हणजे स्नेहा पंडित दुबे, ज्या भाजपच्या तिकिटावर वसई मतदारसंघातून लढल्या आणि विजय मिळवला. वसईची जागा भाजपने पहिल्यांदाच जिंकली आहे. स्नेहा दुबे यांनी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आणि पाच वेळा आमदार असलेले हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला आहे. निवडणुकीत स्नेहा पंडित दुबे यांना 77,553 मते मिळाली, तर हितेंद्र ठाकूर यांना 74,400 मते मिळाली. त्यानंतर, स्नेहा दुबे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
1990 मध्ये वसईतून हितेंद्र ठाकूर यांनी पहिल्यांदा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. यंदा तिरंगी लढतीत स्नेहा पंडित दुबे यांनी त्यांना पराभूत केले आहे.
35 वर्षांनंतर घेतलेला बदला
स्नेहा पंडित दुबे यांचा विजय विशेष महत्त्वाचा आहे कारण त्यांनी आपल्या सासऱ्यांच्या हत्येचा राजकीय सूड घेतला आहे. ९ ऑक्टोबर १९८९ रोजी वसईतील नालासोपारा रेल्वे स्थानकावर त्यांचे सासरे सुरेश दुबे यांची हत्या करण्यात आली होती. हत्येचे मुख्य आरोपी जयेंद्र उर्फ भाई ठाकूर होते. या हत्येचे कारण होते, भूखंड देण्याबाबतचा वाद. सुरेश दुबे यांनी भाई ठाकूर यांना भूखंड देण्यास नकार दिला होता.
रेल्वे स्थानकावर झालेल्या या हत्येने राज्यभर धक्कादायक वातावरण निर्माण केले होते. हत्येच्या प्रकरणात राजकीय दबाव वापरण्याचा आरोप केला गेला होता. केस चालू असताना संबंधित पुरावे नष्ट करण्यात आल्याचा दावा केला जातो. नंतर सुधाकर सुरडकर ठाणे जिल्ह्यात डीआयजी बनल्यावर भाई ठाकूर आणि अन्य आरोपींना टाडा कायद्यानुसार कारावासाची शिक्षा झाली.
हत्येच्या घटनेनंतर भाई ठाकूर आणि त्यांचे बंधू हितेंद्र ठाकूर यांचा राजकारणात वर्चस्व वाढला. स्नेहा पंडित दुबे यांनी 35 वर्षांनी हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला आणि वसईच्या राजकारणात एक नवीन अध्याय सुरू केला. ठाकूर यांना वसईत “डॉन” मानले जाते, त्यामुळे त्यांचा पराभव भाजपसाठी मोठा धक्का ठरला आहे. तसेच, ठाकूर यांचा मुलगा क्षितिज ठाकूर यांनाही भाजपचे राजन नाईक यांनी नालासोपारात पराभूत केले आहे.
हे ही वाचा:
Aditya Thackeray यांचे निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह; म्हणाले, “महाराष्ट्राने मतदान केलंय की…”