spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

राजभवनातून बाहेर पडल्यावर Deepak Kesarkar यांची प्रतिक्रिया; म्हणाले,”नवीन सरकार लवकरच…”

एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे. नवीन सरकार अस्तित्वात येण्याआधी ती औपचारिकता असते". असं दीपक केसरकर म्हणाले. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. आजपासून ते राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्ह्णून काम पाहतील", असं दीपक केसरकर म्हणाले.

आज दि. २६ नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि अजित पवार(Ajit Pawar) हे राजभवनात दाखल झाले. यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. या तिन्ही मंत्र्यांनी राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र त्यांच्याकडे सोपवलं आहे. त्यावेळी दीपक केसरकर  (Deepak Kesarkar) हे सुद्धा होते. राजीनामा देऊन राजभवनातून बाहेर येत असताना दीपक केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे. नवीन सरकार अस्तित्वात येण्याआधी ती औपचारिकता असते”. असं दीपक केसरकर म्हणाले. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. आजपासून ते राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्ह्णून काम पाहतील”, असं दीपक केसरकर म्हणाले.

दीपक केसरकर यांना ‘सरकार कधी स्थापन होणार?’, असा प्रश्न विचारला असता, “नवीन सरकार लवकरच स्थापन होईल, भाजपाची गटनेता निवडीसाठी कदाचित उद्या २७ नोव्हेंबरला बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसतील, चर्चा करतील, मग पक्षश्रेष्ठींकडे जातील. पक्ष श्रेष्ठी जो काही निर्णय घेतील, त्यानुसार ठरेल”, असे दीपक केसरकर म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत बैठकीला बोलवलं, तर एकनाथ शिंदे तिथे जातील. दिल्लीतले निरीक्षक इथे आले तर तो भाजपचा अंतर्गत विषय आहे, त्याबद्दल मी भाष्य करणार नाही”, असे दीपक केसरकर म्हणाले. आम्ही तिघेही एकत्र आहोत, महाराष्ट्राच्या हितासाठी हे सरकार काम करेल” असं दीपक केसरकर म्हणाले. एकनाथ शिंदे नाराज आहेत का? या प्रश्नावर दीपक केसरकर म्हणाले की, एकनाथ शिंदे अजिबात नाराज नाहीत. भाजपचे पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल”.

हे ही वाचा:

कर्जत-जामखेडमध्ये Ram Shinde ठरले कटाचा बळी

मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, शपथविधी होईपर्यंत शिंदे असणार काळजीवाहू मुख्यमंत्री

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss