spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

आज वाजणार दिल्ली विधानसभेचं बिगुल! दुपारी २ वाजता पत्रकार परिषदेत होणार तारखेची घोषणा

भारतीय निवडणूक आयोगाची दिल्ली विधानसभा निवडणुकीसंदर्भात आज दुपारी २ वाजता सार्वत्रिक पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत दिल्ली विधानसभेच्या तारखेची घोषणा करण्यात येईल,अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्ली विधानसभेतील 70 सदस्यांचा कार्यकाळ 23 फेब्रुवारीला संपत आहे. 2020 साली 6 जानेवारीला निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. 8 फेब्रुवारीला मतदान आणि 11 फेब्रुवारीला मतमोजणी झाली होती. दिल्ली विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होण्याची शक्यता आहे. तर, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

तारीख जाहीर झाल्यानंतर, दिल्लीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. सत्ताधारी आम आदमी पार्टीचा हॅट्ट्रिक करण्याचा प्रयत्न आहे. 2015 मध्ये 67 तर 2020 मध्ये 62 जागा आपने जिंकल्या होत्या. मागच्या दोन विधानसभा निवडणुकीत भाजप 10 जागा सुद्धा जिंकू शकलेली नाही. सद्य स्तिथीत आप, भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. भाजपला महाराष्ट्र मध्ये विधानसभेला भरघोस यश मिळाले आहे. त्यामुळे दिल्लीत आता भाजप आपले अस्तित्व टिकवू शकते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे . काँग्रेस आणि आप लोकसभा निवडणूक एकत्र लढले होते. पण विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याची दोन्ही पक्षांनी घोषणा केली आहे. त्यामुळे साहजिकच काँग्रेस देखील ताकदीने ही निवडणूक लढणार आहेत.

माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावेळी सुद्धा नवी दिल्लीतून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यांचि लढत काँग्रेसचे संदीप दीक्षित आणि भाजपच्या प्रवेश वर्मा यांच्याशी आहे. केजरीवाल मागच्या दोन निवडणुकीत इथूनच जिंकून विधानसभेत गेले होते. नवी दिल्ली ही VIP सीट आहे. यावेळी भाजप आणि काँग्रेस दोघे आपल्या स्टार नेत्यांना उतरवनार आहेत. त्यामुळे ईथे कोण बाजी मारताय हे पाहणे चुरशीचे ठरणार आहे. तर,मुख्यमंत्री आतिशी मार्लना कालकाजीमधून विधानसभा निवडणूक लढवत आहे. त्यांचा सामना काँग्रेसच्या महिला अध्यक्षा अलका लांबा आणि दक्षिण दिल्लीचे माजी भाजप खासदार रमेश बिधूडी यांच्याशी आहे.त्यामुळे ही तिरंगी लढत चांगलीच रंगनार आहे.

हे ही वाचा:

Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…

Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss