spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

उपसभापती Dr. Neelam Gorhe यांच्या मार्गदर्शनात शिवसेना महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची स्नेहसंवाद बैठक

नागपूर हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्याकरिता आलेल्या सर्व महिला पदाधिकारी तसेच नागपूर महिला आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी गुरूवार दि. १९ डिसेंबर २०२४ रोजी स्नेहसंवाद बैठकीचे आयोजन केले होते.

नागपूर हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्याकरिता आलेल्या सर्व महिला पदाधिकारी तसेच नागपूर महिला आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी गुरूवार दि. १९ डिसेंबर २०२४ रोजी स्नेहसंवाद बैठकीचे आयोजन केले होते. नवीन ‘४ थे महिला धोरणा’चा आढावा त्याचबरोबर महिलांचे मुद्दे यासंदर्भात डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी महिलांशी संवाद साधला.

कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी जेव्हा आपल्या मागण्या, समस्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या समोर मांडल्या त्यावेळी त्यांनी या महिलांना मार्गदर्शनही केलं. डॉ. नीलमताई या नेहमीच महिलांसाठी लढत असतात त्यांनी घेतलेले निर्णय हे महिलांचे सन्मान वाढवणारे असतात. जेव्हा महिलांवर अन्याय, अत्याचार होतात तेव्हा त्या धावून जातात आणि महिलांना सन्मान देणारी भूमिका घेतात. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन महिलांसाठी फायद्याचे ठरते. नागपूर, नागपूर ग्रामीण, पंढरपूर, गडचिरोली, अमरावती, सोलापूर, बीड, हिंगणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, घनसावंगी अशा वेगवेगळ्या जिल्हा आणि तालुक्यातील शिवसेना महिला जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि कार्यकर्त्या यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

त्यांचे मार्गदर्शन करताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “गेल्या ४ टर्मपासून मी विधानपरिषदेमध्ये काम करते आणि आता गेल्या ५ वर्षांपासून उपसभापती म्हणून काम करते. पण तुमच्या सर्वांच्या शक्तीमुळे महिला शक्तीचा आदर करण्यासाठी मला हे स्थान दिलेलं आहे. माझं एकटीचं हे स्थान नाही, तुमच्या प्रत्येकीचं हे स्थान आहे हा आत्मविश्वास पहिला ठेवा. तुम्हाला पण तेवढीच बुद्धी आहे, कष्ट करत आहात, श्रम करत आहात, बचत गट करत आहात, पण फरक कुठे पडत आहे… संधी मिळाली नाही की लगेच निराश होत आहात.

तुम्ही हा विचार करा की, मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आज त्यांच्याच संपूर्ण कल्पनेतून लाडकी बहीण योजनेचा विषय निघाला. त्यावर किती टीका करण्यात येते पण अनेक महिलांना याचा फायदा झाला. ही योजना म्हणून तुम्ही शक्तीवान आहात. समजातील सत्तेचं पद आणि सत्तापालट ही तुमच्या शक्तीमुळे होऊ शकते हे लाडक्या बहिणींनी दाखवून दिलं आहे. आता प्रश्न असा आहे की, पुढचं पाऊल आपलं काय असणार? आपण महिलांना योजनांविषयी माहिती देण्यासाठी एक शिबिराचे आयोजन करू. आमच्या जी कामाची पद्धत आहे त्यामध्ये आम्ही जास्त गट चर्चा घेतो आणि यामधून कार्यक्रम आखतो. मा. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना ‘४ थे महिला धोरण’ असे महिलांसाठी धोरण तयार केले होते, हे तुम्हाला वाचायचे आहे, यातील योजनांची माहिती घ्यायची आहे. ” अशा शब्दात त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे पुढे बोलताना म्हणाल्या की, ‘४ थे महिला धोरण’ मध्ये महिलांसाठी जवळपास ५० ते ६० योजना आणि निर्णय आहेत. आपल्याला या सगळ्या गोष्टींची माहिती झाली पाहिजे. तुम्हाला सहकार्य मिळावं या दृष्टीकोनातून अधिकाऱ्यांशी बोलून त्या शिबिरामध्ये मार्गदर्शन करू. आरोग्य शिबिरही घेता येतात, आपण त्याचीही माहिती घेऊ. सध्या आपल्या शाखा जेवढ्या पाहिजे तेवढ्या नाहीयेत त्यामुळे प्रत्येकीच्या भागात आपण शाखाप्रमुख नेमल्याच पाहिजेत. जोपर्यंत शाखाप्रमुख नेमत नाही, तोपर्यंत संघटना होणार नाही. त्यामुळे शाखांचं टार्गेट ठेवा, ते करत असताना त्या भागात कमीतकमी १०० महिलांची टीम झाली पाहिजे. त्यामध्ये सर्व घटकातील महिला असाव्या. उद्या तिकीटासाठी जर जागा राखीव झाली तर आपल्याकडे जिल्हापरिषदेत, ग्रामपंचायतीत, पंचायत समितीत आणि महानगरपालिकेमध्ये उभं राहण्यासाठी महिला असल्या पाहिजे”, अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांसाठी भविष्यातील धोरण मांडले.

हे ही वाचा:

बीड, परभणीतील मृतांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत- CM Devendra Fadnavis

शरद पोंक्षेंचं धक्कादायक वक्तव्य, हा अजून मरत नाही, जिवंत कसा?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss