पुरोगामी महाराष्ट्र हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने चालणारा असून आज राज्यांमधील अनेक नेते मंडळींना त्यांच्या विचारांचा विसर पडला आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून धर्मा धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारी विधाने केली जात आहेत. या नेतेमंडळी आणि मंत्र्यांनी महाराष्ट्रात फूट पडू नये आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा विचार करून आपली वक्तव्य करावीत, आजवर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सर्वधर्म समभावाचे विचार ठेवून राजकारण केले आहे.
त्यांच्या विचाराच्या प्रेरित राजकारण करणे गरजेचे असून महाराष्ट्राला सहन होणार नाहीत आणि महाराष्ट्र तुटेल अशी कोणीही विधाने करू नयेत असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले असून सातत्याने दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे आणि सातत्याने कोणता तरी वाद ओढवून घेणारी विधाने करणारे मंत्री नितेश राणेंचे कान टोचले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त सातारा दौऱ्यावर आले होते. त्यांनी साताऱ्यातील कराड येथे असलेल्या प्रीती संगमावरील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला भेट देऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतलेल्या वेळेला पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील विविध मान्यवर नेते मंडळी उपस्थित होते.
हे ही वाचा :
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारे हजारो शेतकरी मुंबईतील आझाद मैदानावर
पुरस्कार सोहळ्यातील फोटो शेअर करत सिद्धार्थ जाधवची भावूक पोस्ट, ‘अशोक मामा…’