Friday, December 1, 2023

Latest Posts

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संभाजीनगर दौऱ्यावर, जरांगे यांची भेट घेणार?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संभाजीनगर दौऱ्यावर, जरांगे यांची भेट घेणार?

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे- पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांची फडणवीस आज भेट घेतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा आजचा संभाजीनगरचा दौरा महत्वाचा समजला जात आहे. मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू असताना आंतरवाली सराटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांनी भेट दिली होती. परंतु, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात झालेल्या उपोषणास्थळी फडणवीस एकदाही गेले नव्हते, याचवेळी मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर थेट टीकाही केली होती. यावरून भाजपच्या काही नेत्यांनी देखील मनोज जरांगे यांना प्रतिउत्तर दिले होते. ज्या छत्रपती संभाजीनगर शहरात जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहेत , त्याच संभाजीनगरमध्ये आज उपमुख्यमंत्री फडणवीस येणार आहे. त्यामुळे आज तरी जरांगे आणि फडणवीस या दोघांची भेट होईल का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार उपमुख्यमंत्री फडणवीस

छत्रपती संभाजीनगरच्या आयोध्या नगरी मैदानावर बागेश्वर बाबा यांचे तीन दिवसीय कार्यक्रम आणि प्रवचन होत आहे. बागेश्वर बाबांच्या दरबाराचा समारोप आज होणार आहे. त्यामुळे, याच कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस येणार आहेत. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते आरती केली जाणार आहे, सोबतच यावेळी फडणवीस यांचे त्याठिकाणी भाषण देखील होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर शहरात येणार असल्याची भाजपकडून पक्षाकडून वेगवेगळ्या वृत्तपत्रात मोठी जाहिरात देखील देण्यात आली आहे.

जरांगे यांची भेट भुजबळांनी टाळली

दोन दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ हे छत्रपती संभाजीनगर शहरात आले होते. ज्याप्रमाणे मनोज जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती, त्याचप्रमाणे त्यांनी मंत्री भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला होता. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात येऊन देखील छगन भुजबळ यांनी जरांगे यांची भेट घेण्यास टाळले होते. तसेच, आपण जरांगे यांची भेट घेणार नाही, पण त्यांना शुभेच्छा असं देखील भुजबळ म्हणाले होते.

हे ही वाचा : 

आजचे राशिभविष्य,०८ नोव्हेंबर २०२३;शारिरीकदृष्ट्या तुम्हाला सक्षम राहण्यासाठी…

सुप्रिया सुळेंच्या विरोधात केलेल्या तटकरे यांच्या वक्तव्याचा जितेंद्र आव्हाड यांनी घेतला समाचार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss