spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

महाविकास आघाडीकडून वोट जिहाद करण्याचा प्रयत्न: Devendra Fadnavis

राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू झालेली पाहायला दिसत आहे. तसेच निवडणुकांचा रणसंग्रामही आता जोरदार सुरू झाला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. सध्या निवडणुकांचा माहोल तापलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीकाटिपण्ण्या करतायेत. अश्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) मोठा आरोप करत महाविकास आघाडीकडून वोट जिहाद (Vote Jihad) करण्याचा प्रयत्न होत असल्याचे विधान केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांची आज (शनिवार, १६ नोव्हेंबर) आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार कृष्णा गजबे यांच्या प्रचारार्थ गडचिरोली येथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, “धर्माचा वापर करून शरद पवार यांचा पक्ष, उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि काँग्रेस वोट जिहाद करत आहे हे अतिशय खेदजनक आहे. सज्जाद नोमानी यांनी 17 मागण्या या तीन पक्षांना दिल्या होत्या, या मागण्या इतक्या भयानक आहे की मुस्लिमांना दहा टक्के आरक्षण द्या, 2012 ते 2024 राज्यात जेवढे दंगे झाले त्यातील मुस्लिम आरोपींवरील केसेस परत घ्या, आर एस एस वर बंदी घाला अशा प्रकारच्या मागण्या त्यांनी केल्या आणि या पक्षांनी या मागण्या मान्य करू असं सुद्धा सांगितलं आहे. सज्जाद नोमानी वोट जिहाद करण्यास सांगत आहेत, वोट जिहादचे आला सीपसालार हे शरद पवार आहे, उद्धव ठाकरे आहे राहुल गांधी आणि नाना पटोले आहे असे सांगतात. निवडणुकीच्या काळात इतकं लांगुलचालन आम्ही यापूर्वी कधी बघितलं नव्हते. अल्पसंख्यांक मतं मिळवण्यासाठी विरोधी पक्ष महाविकास आघाडी काम करत असेल तर त्या विरुद्ध सगळ्यांना एक व्हावं लागेल. जे बहुसंख्य मते आहे, त्यांना पुनर्विचार करावा लागेल एक यावं लागेल,” असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “यापेक्षा भयानक नोमानींचा दुसरा व्हिडिओ आला त्यात ते म्हणतात की लोकसभेत काही मुस्लिम लोकांनी भाजपला मतदान केलं त्यांना शोधून काढा आणि त्यांचा दाणापाणी बंद करा सोशल बायकॉट करा असे सांगत आहेत. स्वतःला सेक्युलर म्हणवून घेणारे महाविकास आघाडीचे लोकं यावर एक शब्द बोलत नाही. हे एक्स्ट्रीम पोलरायझेशन ज्या पद्धतीने महाविकास आघाडी करत आहे त्याला निश्चितपणे उत्तर देऊ. सोशल बायकॉट करणे हा एक प्रकारचा गुन्हा आहे. किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात एक इलेक्शन कमिशनला तक्रार केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले की आपल्याला एक राहावं लागेल, एक आहे तर सेफ आहे. आज काँग्रेस जाती-जातीत विभाजित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्याकडे दुसरा मुद्दा नाही ते विकासावर बोलत नाहीत, त्यांच्याकडे रोडमॅप नाही फक्त जातिवाद करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत.”

हे ही वाचा:

मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss