spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

अमित शाहच्या बोलण्यातून देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचा मानस जाहीर; जयंत पाटील म्हणाले…

जयंत पाटील म्हणाले आहेत की, अजित दादा आणि एकनाथ शिंदे हे दोघेही भाजपसोबत संरक्षण मिळवण्यासाठी गेले आहेत.

Jayant Patil on Chhagan Bhujbal Statement : मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम ही सुरू आहे. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे. विधानसभा निवडणुकांच्या मतदानासाठी आता अवघे ११ दिवस उरले आहेत. संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी निवडणूक होणार आहेत. तर त्यापुढे तीन दिवसांनी म्हणजे २३ नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यात निकाल हा जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याला जणू युद्धभूमीचं स्वरूप आलं असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाक लावला आहे, सभांचा धुरळा उडालाय. तर आरोप प्रत्यारोपाचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. अश्यातच पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्ष भाजपबरोबर महायुतीत सहभागी झाल्याने सगळ्यांनाच आनंद झाला. कारण ईडीपासून झालेली सुटका… ती सुटका झाल्याने सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला, असं छगन भुजबळ यांनी ‘2024 : द इलेक्शन सरप्राईज्ड इंडिया’ या पुस्तकात म्हटलं आहे. त्यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शिराळ्याच्या सभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले आहेत. त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलत असताना जयंत पाटील म्हणाले आहेत की, अजित दादा आणि एकनाथ शिंदे हे दोघेही भाजपसोबत संरक्षण मिळवण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे ते टर्म्स सांगू शकत नाहीत. भाजपला येत्या निवडणुकात विजय मिळण्याची शक्यता कमी आहे. जर मिळाला तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा मानस त्यांनी जाहीर केलंय. त्यामुळे यावर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया महत्वाची आहे, असं जयंत पाटील म्हणालेत.

छगन भुजबळ पुस्तक यांनी स्वतः हून सांगितलं की ओबीसी असल्याने ईडी आणि यंत्रणांनी फार त्रास दिला आणि काही लोकांच्या चौकशी सुरु झाल्या. त्यामुळे चौकशी सुरु होतायत म्हटल्यावर एकत्रितपणे येऊन भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असं म्हटलंय. तिकडचं संरक्षण मिळवलं असं भुजबळ साहेबांच्या बोलण्यातून दिसतंय. त्यामुळे ते तिकडं का गेले? हे लोकांना पुन्हा एकदा कळालं आहे, असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

मराठा आरक्षणावरून Raj Thackeray यांचा Manoj Jarange यांना टोला; म्हणाले, “तुम्हाला लढायचे लढा नाही तर…”

अजित पवारांकडून बारामती मतदारसंघासाठी जाहीरनामा सादर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss