Saturday, June 3, 2023

Latest Posts

Devendra Fadnavis यांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल, साडेतीन जिल्ह्याचा पक्ष…

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेत आहे. अश्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राष्ट्रवादीवर हल्लाबोल हा केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेत आहे. अश्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राष्ट्रवादीवर हल्लाबोल हा केला आहे. आज देवेंद्र फडणवीस यांची कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सीमाभागातील निपाणीमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.

आज बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी यांनी राष्ट्रवादीची संभावना साडेतीन जिल्ह्याचा पक्ष अशी केली. यावेळी बोलताना त्यांनी शशिकला जोल्ले आजच निवडून आल्याचे जाहीर करतो असे फडणवीस म्हणाले. तसेच पुढे फडणवीस म्हणाले आहेत की, इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील उमेदवार आहे. मात्र, हा राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय डोंबलं करणार? इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिलगीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचे बघतो. काँग्रेसला आता राहिलेच नाही अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणीस यांनी हल्लाबोल केला. पाकिस्तानात किती महागाई आहे याची कल्पना तुम्हाला आहे का? मात्र, आपली अर्थव्यवस्था गतीने पुढे जात आहे. या मतदारसंघात काही लोक जातीयवादीपणा करत आहेत. काँग्रेसचं तर डोकं फिरलं आहे. त्यांचे नेते म्हणाले हिंदू शब्द अश्लील आहे. तुमचा मेंदू सडला आहे म्हणून तो अश्लील वाटतो. असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कर्नाटकात सगळ्यात जास्त लीडने शशिकला जोल्ले या निवडून येणार आहेत. आज सभेला झालेली गर्दी पाहिली असता वहिनी निवडून आल्या असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी थेट जाहीरच केले आहे. तसेच या निवडणुकीत तुमच्या भाग्याचा प्रश्न उपस्थित होणार आहे. माता भगिनींच्या नावाने घर केलं जाणार आहे. पुरुषांच्या नावात घर असणार नाही. माफ करा पुरुषांनो, ते कधी विकून टाकतील याचा नेम नाही, पण भगिनी तसं करत नाहीत. मोदींनी दिलेल्या लसीमुळे आज सगळे जिवंत आहोत, पाकिस्तानचा नेता कटोरा घेऊन निघाला आहे, पण कोणी त्यांना मदत करत नाहीत असं देखील आज देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss