भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. उद्या ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांचा आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्ह्णून देवेंद्र फडणवीस हे राज्याचा कारभार सांभाळतील. विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर त्यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी भाजपच्या नवनियुक्त आमदारांना काही सूचक सल्लाही दिला.
विधिमंडळ गटनेतेपदी म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर त्यांनी सर्व नेत्यांचे आणि वरिष्ठांचे आभार मानले. ते म्हणाले की, ” आज आपल्या महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. भाजपाला १३२ आणि महायुतीला २३७ जागा मिळाल्या. हे महाराष्ट्रातील अभूतपूर्व यश आहे. मी मोदींचे आभार मानेल. बूथचा कार्यकर्ता म्हणून, वॉर्डचा कार्यकर्ता म्हणून काम केले, अशा व्यक्तीला तीन वेळा मुख्यमंत्रीपदावर बसवलं. एकदा ७२ तासांसाठी होतो, पण टेक्निकली होतो. हा पक्ष मोठा झाला. मी मोदींचे आभार मानतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “तुम्ही आहात म्हणू मी इथे आहे. तुम्ही नसता तर मी नसतो. त्यामुळे तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. पण पुढची वाट अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संघर्षाची आहे. आपल्याला अपेक्षा पूर्ण करायचे आहे. आपलं महायुतीचं सरकार आहे. एवढा मोठा कौल असल्यावर सगळ्यांच्या पूर्व गोष्टी आपल्याला पूर्ण करता येत नाही. पण मोठा गोल घेऊन आपण राजकारणात आलो आहोत. पदासाठी किंवा कुणी तरी मोठं करावं यासाठी आलेलो नाही. येणाऱ्या काळात चार गोष्टी मनासारख्या होतील तर काही मनाविरुद्ध होतील. लार्जर इंट्रेस्ट मध्ये काम करू. आपली शक्ती दाखवून देऊ”, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले.
हे ही वाचा:
वर्षा निवासस्थानी घडामोडींना वेग, देवेंद्र फडणवीस शिंदेंच्या भेटीला
राज्यभरात EVM विरोधात आंदोलन पेटणार, आढावांनी उपोषण सोडलंय पण वातावरण तापवलंय… | Baba Aadhav