spot_img
spot_img
Tuesday, October 3, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

देवेंद्र फडणवीसांनी अमरावतीत केले हे वक्तव्य

युवा स्वाभीमानी पक्षातर्फे दहीहंडीचा कार्यक्रम अमरावती येथे आयोजित करण्यात आला. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. शिल्पा शेट्टी, राजपाल यादव, खासदार अनिल बोंडे उपस्थित होते.

युवा स्वाभीमानी पक्षातर्फे दहीहंडीचा कार्यक्रम अमरावती येथे आयोजित करण्यात आला. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. शिल्पा शेट्टी, राजपाल यादव, खासदार अनिल बोंडे उपस्थित होते. या कार्यक्रमाता बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, फिल्ममध्ये काय केलं ते आपण बघीतलं. हे सगळे प्रयत्न करतात. अमरावती जिल्ह्याला मोदी सरकारने जे दिलं ते गेल्या ७० वर्षांत मिळालेलं नाही. भाजप सरकारने मेडिकल कॉलेज, विमानतळ, टेक्सटाईल पार्क दिला. टेक्सटाईल पार्कमधून तीन लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये क्रीडा विद्यापीठ होत आहे. रिद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ होत आहे. दोन हजार कोटी रुपये रस्त्याच्या कामासाठी दिले आहेत.

तुकडोजी महाराज, गाडगेबाबा आणि प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांची प्रेरणा घेण्यासाठी सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे. भारत माता की जय असं आपण म्हणतो. पण, इंडिया माता की जय म्हणत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगावला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा, नवनीत राणा, अनिल बोंडे यांनी अमरावतीसाठी केलेल्या कामाची स्तुती केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी अगदी दाव्याने सांगतो की, अमरावती जिल्ह्याला मोदी सरकारने आणि आमच्या सरकारने जे दिलंय ते गेल्या ७० वर्षात मिळालेलं नाही. माझा दावा आहे की, आजपर्यंत सर्वात जास्त कुणी दिलं असेल, तर ते आमच्या सरकारने दिलं आहे. या कामात नवनीत राणा आणि रवी राणा पुढाकार घेऊन काम करत आहेत याचा मला आनंद आहे.” मी नवनीत राणांना या निमित्ताने सांगू इच्छितो की, त्यांनी काळजी करू नये. लोकांचं नवनीत राणांवर खूप प्रेम आहे. त्या मोदींसाठी काम करत आहेत.

या देशात जो मोदींना साथ देईल त्याला लोक निवडून देतील. म्हणून आमचं सरकारही पूर्णपणे त्यांच्या पाठिशी उभं आहे. आपण मोदींच्या नेतृत्वात चांद्रयान उतरवलं. चंद्राच्या दक्षिण धृवावर यान उतरवणारा पहिला देश भारत आहे,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. फडणवीस पुढे म्हणाले, “भारत माता की जय म्हणायला किती चांगलं वाटतं. इंडिया माता की जय म्हणायला चांगलं वाटतं का? आपण इंडिया माता की जय म्हणतो का? आपण भारत माता की जय म्हणतो. भारताचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. ते सर्वसामान्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करतील. तुमचा आशीर्वाद पाठिशी असू द्या. त्याचबरोबर श्रीकृष्ण अमरावती जिल्ह्याचे जावई आहेत. त्यामुळे प्रभु श्रीकृष्णाचं आणि आमचं जे नातं आहे त्यामुळे हा प्रेमाचा काला प्रत्येकापर्यंत पोहचवण्याचं काम आपण निश्चितपणे करू,” असंही फडणवीसांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा: 

राज ठाकरे यांचा पुणे दौऱ्यावर,अनोखा उपक्रम

सूरज पांचोली गेल्या ७ वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss