Saturday, June 3, 2023

Latest Posts

The kerala story चित्रपटांवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, सडलेल्या मनाच्या विचारांना….

'द केरळ स्टोरी' चित्रपटाबाबत राजकीय वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. सध्या चित्रपटाबाबत अनेक नेते वादग्रस्त विधाने करत असताना दुसरीकडे अनेक नेते चित्रपटाच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाबाबत राजकीय वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. सध्या चित्रपटाबाबत अनेक नेते वादग्रस्त विधाने करत असताना दुसरीकडे अनेक नेते चित्रपटाच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी दिनांक ९ मे रोजी भाजप कार्यकर्त्यांसोबत चित्रपट पाहण्यासाठी नागपुरात पोहोचले. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपटाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी मोठा पलटवार केला आहे. ‘द केरळ स्टोरी’च्या दिग्दर्शकाला फाशी द्या, असे म्हणणाऱ्यांना खरे तर त्या लोकांच्या कुजलेल्या विचारांना फासावर लटकवले पाहिजे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

अनेक भाजप नेते आणि कार्यकर्त्यांसह चित्रपट पाहण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘द केरळ स्टोरी’ हे जनजागृतीची मोहीम असल्याचे वर्णन केले. हा चित्रपट नसून प्रबोधनाची मोहीम आहे, जी खऱ्या अर्थाने सिनेमाच्या माध्यमातून समोर आणली जात असल्याचे त्यांनी सांगितले. या चित्रपटाच्या माध्यमातून समाजात कसा फरक निर्माण केला जात आहे आणि महिलांवर कसा अन्याय होत आहे हे सांगण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा केवळ सिनेमा नसून काही सत्य घटनांवर आधारित प्रबोधनाची मोहीम आहे, ब्रेनवॉशिंग करून महिलांवर ज्याप्रकारे अत्याचार केले जात आहेत आणि देशाविरुद्ध षडयंत्र रचले जात आहे. जे काही घडत आहे, ते ठळकपणे मांडण्याचे काम या चित्रपटातून केले जात आहे. वास्तविक, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाबाबत सांगितले होते की, या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला फाशी द्यावी, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार करत म्हटले की, असे बोलणार्‍यांची मने सडलेली आहेत. सडलेल्या विचारांना फाशी द्यावी.

हे ही वाचा : 

कोकण स्पेशिअल चमचमीत फणसाची भाजी माहीत आहे कशी बनवतात? जाणून घ्या आमच्या स्पेशिअल रेसिपी मधून!

न्यू स्टाईलमध्ये बनवा White Sauce Pasta

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss