Saturday, June 3, 2023

Latest Posts

देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना खोचक टोला

संसद भवनाचे उद्घाटन देशाच्या राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या हस्ते व्हावे ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर सर्वच विरोधकांनी केली होती.

संसद भवनाचे उद्घाटन देशाच्या राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या हस्ते व्हावे ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर सर्वच विरोधकांनी केली होती. पण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना या कर्यक्रमाला न बोलवता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच (Narendra Modi) या नव्या वास्तूचे उद्घाटन करणार आहेत असे सांगण्यात आले आहे. २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे आता देशामधील राजकारण तापले आहे. असे सांगण्यात आले आहे की २० विरोधी पक्ष या समारंभामध्ये सहभागी होणार नाहीत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनीही या कार्यक्रमाला जाण्यास नकार दिला आहे.

त्यांनतर यावरूनच आरोप प्रत्यारोप होत असताना आता भारतीय जनता पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर खोचक टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकशाहीमध्ये अशाप्रकारचे कावीळ झाल्यासारखे वागणे हे अत्यंत अयोग्य आहे. पंतप्रधानांना करण्याचा ज्यांना ज्वर चढला आहे असे लोक लोकशाहीच्या मंदिराच्या उद्घाटनालाही जात नाहीत. ते कारणे सांगत आहेत ही हास्यास्पद येण्यासारखीच गोष्ट आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभा अध्यक्षांनी नवीन इमारतीचे उद्घाटन केल्यास आमचा पक्ष सहभागी होईल, अन्यथा आम्ही बहिष्कार टाकू असे ते म्हणाले.

पुढे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंना कोण घेऊन जातंय. उद्धव ठाकरेंना जी जागा दिली जाते तेथे ते जात नाहीत. ते विधानपरिषदेचे सदस्य आहेत ते तेथे २ तास जाऊन बसू शकत नाहीत. मग त्यांना कोण लोकसभेमध्ये बोलवणार आहे कोण पार्लमेंट हाऊसमध्ये बोलावणार आहे? असे बोलून देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. बरेच वर्ष संसद भवन निर्माणाची चर्चा व्हायची परंतु कोणी बनवले नाही. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते संसद भवन बनवून दाखवले त्यामुळे कुठेतरी पोटात दुखत आहे आणि तेच दिसते आहे.तसेच नवीन संसद भवन हे देशाचे शान आहे. जेवढ्या कमी वेळामध्ये हे संसद भवन तयार करण्यात आले आहे त्यावरून देशाची ताकद दिसत आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss