Friday, March 29, 2024

Latest Posts

सावरकर चित्रपटाचा ट्रेझर वरून देवेंद्र फडणवीसांनी केले ट्विट

गेल्या काही महिन्यांमध्ये ‘द कश्मीर फाईल्स’ आणि ‘द केरला स्टोरी’ या दोन चित्रपटांवरून गेल्या वर्षभरात मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता सावरकरांच्या चित्रपयाच्या माध्यमातून राज्यात नवीन कोणता वाद तयार होणार आहे हे पाहणे गरजेचे आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये ‘द कश्मीर फाईल्स’ आणि ‘द केरला स्टोरी’ या दोन चित्रपटांवरून गेल्या वर्षभरात मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता सावरकरांच्या चित्रपयाच्या माध्यमातून राज्यात नवीन कोणता वाद तयार होणार आहे हे पाहणे गरजेचे आहे. रणदीप हुडाच्या आगामी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाची चर्चा जोरात चालू आहे. या चित्रपटात रणदीप हुडा यांनी विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. काल सावरकरांची जयंती होती. या निमित्ताने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. हा टीझर पाहून प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा आला आहे. अभिनेता रणदीपने सावरकरांची साकारलेली भूमिका पाहून सगळेच भारवले आहेत. एवढेच नाही तर या चित्रपटाचे तो दिग्दर्शनही करत असल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने नव्या संसदेचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळेच विरोधकांनी सोहळ्यावर बहिष्कार घातल्याचे दावेही सत्ताधारी भाजपाच्या नेतेमंडळींकडून करण्यात आला.

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात सावरकर जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा पुतळा हटवल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी रणदीप हुड्डाच्या आगामी चित्रपटाचा टीजर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी ‘सावरकर’ या सिनेमाचा टीजर आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. “रणदीप हुड्डाची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘सावरकर’ या चित्रपटाचा टीझर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १४० व्या जयंतीनिमित्ताने लाँच करण्यात आला. वीर सावरकर हे भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी होते, ज्यांनी ब्रिटिश राजवटीविरोधात सशस्त्र क्रांतीला प्रेरणा दिली. ‘सावरकर’ लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे”, असं या ट्वीटमध्ये देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रणदीप हुड्डानं या चित्रपटात स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या टीजरमध्ये ‘दी मोस्ट वाँटेड इंडियन बाय ब्रिटिश’, असा सावरकरांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच अभिनेता रणदीप हुडा याला चित्रपटासंदर्भात विचारणा केली असता, महात्मा गांधी वाईट नव्हते. पण जर त्यांनी त्यांचा अहिंसेचा हट्ट सोडून दिला असता, तर भारत ३५ वर्षांपूर्वीच स्वतंत्र झाला असता”, असा संवाद सावरकरांच्या तोंडी दाखवण्यात आला आहे. असेही अभिनेता रणदीप हुडा म्हणाला. या चित्रपटाचा विषय आणि सावरकरांच्या मुद्द्यावरून देशात निर्माण झालेल्या राजकीय सुंदोपसुंदीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपटदेखील वादात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा:

पुढच्या आठवड्यापर्यंत येणार मान्सून केरळमध्ये; मुख्यमंत्रांकडून आढावा बैठकांना सुरवात

Dehli च्या Jantar Mantar वर कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झाला राडा | Delhi | Indian Wrestlers

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss