Dhananjay Deshmukh: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी अनेक दिवस उलटून गेले तरी आरोपी अजून पकडले गेले नाहीत. यावर अनेक राजकीय नेते आपले मत मांडतात. यावर आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सवाल उपस्थित केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जी तत्परता धनंजय मुंडे यांना भेटीसाठी दाखवली तीच तत्परता देशमुख कुटुंबाच्या भेटीसाठी का दाखवली नाही असा सवाल धनंजय देशमुखांनी केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सुरेश धस (Suresh Dhas) आणि धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांची भेट घालून दिली त्यामागे त्यांचा काय हेतू होता हे आम्हाला माहीत नाही. मात्र ही तत्परता बावनकुळे साहेबांनी देशमुख कुटुंबाच्या भेट घेण्यासाठी का दाखवली नाही? असा सवाल सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांचे बंधु धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी उपस्थित केला आहे.
घटना घडल्यानंतर हत्या करणारे सगळे आरोपी हे वाशीमार्गे पळून जातात, पोलीस सांगतात की ते जंगलातून पळून गेले. मात्र मला सांगा की वाशीमध्ये कोणत्या प्रकारचे जंगल आहे? ते तुम्हाला सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत. तुम्ही पत्रकार तिथे पोहोचलात मग तिथे पोलीस का पोहोचले नाहीत? असा आमचा सवाल आहे. त्यामुळे आम्ही सुरुवातीपासून म्हणतोय की या प्रकरणांमध्ये पोलिसांनी तपासामध्ये दिरंगाई केली आहे आणि याच्यावर चर्चा करण्यासाठी आज नागरिक आम्ही एकत्र भेटणार आहोत. असे आरोप देखील धनंजय देशमुख यांनी केले आहेत.
मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी, आरक्षणासाठी लढाई लढत आहेत. मी माझं दुःख बाजूला सारून जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये उभा राहिलोय. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमच्या पीडित कुटुंबीयांना भेट घेण्यासंदर्भात विचार विनिमय करायला पाहिजे होता. मात्र बावनकुळे यांनी दुसऱ्याच लोकांच्या भेटीगाठी करून देण्याससाठी प्रयत्न केले, याचा मला खेद वाटतो.आम्हाला असं वाटतं की ज्यांनी या प्रकरणातील आरोपींना मदत केली त्यांच्यावर कारवाई पाहिजे.असेही धनंजय देशमुख म्हणाले.अजित पवार यांच्या राजीनामा संदर्भात विचारले असता, ते काय म्हणाले आम्हाला माहित नाही, यावर आम्ही काही मत मांडणार नाही. असे धनंजय देशमुख म्हणाले.
महाराष्ट्राबाहेरही देशभर सर्वत्र अनागोंदी माजली असून समाज भयभीत झाला आहे. मणीपूर हे त्याचे धगधगते उदाहरण आहे. ठिकठिकाणची शासनं कायदेशीर व परिणामकारक कृती करण्याऐवजी फक्त बोलघेवडेपणा व पक्षपातीपणा करताना दिसत आहेत. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या चौकशीचे प्रकरण व बीड जिल्ह्यातील खंडणीखोरीचे व भ्रष्टाचाराची मोठमोठी प्रकरणे ही त्याची ढळढळीत उदाहरणे व पुरावे आहेत. हे चित्र बदलण्यासाठी तातडीने परिणामकारक कृतीची, कायद्याच्या कठोर अमंलबजावणीची आणि गुन्हेगारी मोडून काढण्याची नितांत गरज आहे.