Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Beed : काल २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडली असता, विधासभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी परळी मतदार संघातील घाटनांदूर येथे मतदान केंद्रावर तोडफोडीची घटना घडली होती. या दरम्यान मतदान केंद्रावर असलेल्या ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीनची तोडफोड केल्याचं देखील समोर आलं होत. आता या घडलेल्या प्रकरणी जवळपास ४० जणांवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. महाविकास आघाडीचे नेते (Madhav Jadhav) ऍड. माधव जाधव यांना कन्हेरवाडी येथे मारहाण करण्यात आली. मारहाणीतील व्हिडीओ व्हायरल होताच या मारहाणीचे पडसाद संपूर्ण मतदार संघात उमटले. यावेळी तक्रार देण्यात आली आहे की मतदान केंद्राची तोडफोड करण्यात आली असून कर्मचाऱ्याला सुद्धा मारहाण करण्यात आली. तसेच यानुसार चाळीस जणांवर गंभीर आरोप करून गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी यापैकी सात जणांना ताब्यात घेतले आहे.
घाटनांदुर गाव आज बंद
माधव जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांना मारहाण झाल्यानंतर त्याचे पडसाद घाटनांदुर या ठिकाणी म्हटले आणि घटना येथील मतदान केंद्रामध्ये तोडफोड झाल्या प्रकरणी ऐकून ४० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच घाटनांदुर याच घटनेच्या निषेधार्थ आज बंद ठेवण्यात आलेले आहे. घाटनांदुर येथे सकाळपासून दुकाने उघडलेली नाहीत. कालच्या घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी दाखल केलेल्या तरुणावरील गुन्ह्याच्या निषेधार्थ घाटनांदुर आज बंद आहे.
धनंजय मुंडे यांचा आरोप मतदारसंघात दहशत निर्माण-
अजित पवार गटाचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी असा आरोप केला आहे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आणि मुलाने मतदारसंघात दहशत निर्माण केले. तसेच परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये कधी नव्हे ते गालबोट या निवडणुकीला लागले असून या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख यांच्याकडून दहशत पसरवण्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. घाटनांदुर मुरंबी मतदान केंद्रामध्ये तसेच चोथेवाडी या ठिकाणी मतदान यंत्राची तोडफोड करण्यात आली. तसेच धनंजय मुंडे यांनी असाही आरोप केला आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बन्सी शिरसाट यांनाही मारहाण केली आहे. ज्यांनी तोडफोड केली त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा धनंजय मुंडे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माधव जाधव यांना मारहाण
शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख हे परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये बोगस मतदान होत असल्याची तक्रार करत आहेत. तासेच याचदरम्यान परळी शहरातील बँक कॉलनी परिसरामध्ये असलेल्या मतदान केंद्रावर उमेदवार मतदान केंद्रातील माहिती घेत असताना बाहेर उभे असलेले ऍडव्होकेट माधव जाधव यांना तीन ते चार जणांनी मारहाण केल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा:
Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४% मतदान