Dhananjay Munde Resignation: डिसेंबरमध्ये बीड जिल्ह्यातील एका सरपंचाच्या हत्येप्रकरणी त्यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याला अटक झाल्यानंतर महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्यांचे सहकारी वाल्मिक कराड यांना अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असलेले मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांनी अखेर ८२ दिवसानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्र्याकंडे सादर करण्यात आली आहे. त्यांचे पीए राजीनाम्याची कॉपी घेऊन सागर बंगल्यावर पोहचले आहेत.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde Resign) यांनी आज (४ मार्च) अखेर राजीनामा दिला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आहे. बीडच्या मस्साजोगमधील (Beed Massajog) सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh case) हत्येप्रकरणात, धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. याच प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर, महाराष्ट्राभरातून संतापाची लाट उसळली होती. अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले होते. तर तातडीने मुख्यमंत्री विधानभवनाकडे निघाले होते. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे, अशी घोषणा प्रसार माध्यमांसमोर दिली. आपण हा राजीनामा स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवल्याचे, मुंडे यांना पदमुक्त केल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांचा राईट हँड म्हणून ओळखला जात होता. धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीच्या काळातील प्रचाराचे व्यवस्थापन ते त्यांच्या अनुपस्थितीत बीड जिल्ह्यातील कारभाराची जबाबदारी वाल्मिक कराडच्या खांद्यावर होती, असे सांगितले जाते.
हे ही वाचा:
Skin Care: पिंपल्सच्या समस्येपासून सुटकारा; गुलाब पाण्यात मिसळा ‘या’ गोष्टी