बीड सरपंच हत्या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी विरोधकांसह राज्यपालांकडे तक्रार करून धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेटदेखील घेतली. अजित पवार – धनंजय मुंडे यांच्यात राजीनाम्याबाबत राज्यपालांकडून विचारणा झाल्यास काय माहिती द्यावी यावर चर्चा झाली आहे? अशी सूत्रांची माहिती आहे.
बीड सरपंच हत्या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव घेत आरोप केल्यानंतर विरोधकांकडूनही धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. विरोधकांचं शिष्टमंडळ राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या भेटीसाठी गेले होते. या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे धनंजय मुंडे यांच्याबाबत तक्रार करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर राष्ट्रवादी शप पक्षाचे नेते शरद पवार यांनी देखील याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून कारवाईची अपेक्षा व्यक्त करणारे पत्र दिल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही दबाव वाढला आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागणार असल्याने मुंडे आणि पवार यांच्यात त्याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते.
मंत्री धनंजय मुंडे दुपारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. यानंतर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर माध्यमांना प्रतिक्रिया न देताच परत गेले. यानंतर अजित पवार धनंजय मुंडे यांच्यात मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याबाबत जोपर्यत चौकशी पूर्ण होत नाही आणि ठोस पुरावे समोर येत नाहीत तोवर अभय देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावा नाही, तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई नाही, असं अजित पवार यांचं मत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणात एसआयटी चौकशी, न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत कारवाई नाही, असं अजित पवार यांचं मत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. न्यायालयीन चौकशी, एसआयटी आणि सीआयडी चौकशी होईपर्यंत कारवाई नाही. तीनही चौकशींमध्ये जो दोषी असेल, त्यावर कारवाई करणार, अशी अजित पवार यांची भूमिका आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचा सध्या तरी राजीनामा घेतला जाणार नाही, असे संकेत मिळत आहेत.
-किशोर आपटे
हे ही वाचा:
“मी गरिबासाठी लढणार, मागे हटणार नाही”,Jarange Patil यांचा पु्न्हा एकदा धनजंय मुंडेंवर हल्लाबोल!
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.