गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडेंवर संतोष देशमुख प्रकरण, वाल्मिक कराडशी असणारे आर्थिक हितसंबंध, कृषिघोटाळ्यावरून आरोप होत आहेत. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा असा दबावही वाढत असताना दुसरीकडे करूणा मुंडेंनी ओढलेले ताशेरे आणि सतत होणाऱ्या आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत आहे. या अनुषंगाने गुरुवार १३ फेब्रुवारी रात्री ‘देवगिरी’ बंगल्याबावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दोन तास चर्चा केली. या चर्चादरम्यान धनंजय मुंडेवरील आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत पक्ष कोणतीही कारवाई करणार नसल्याची भूमिका घेत पुन्हा एकदा अजित पवारांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे.
धनंजय मुंडेंवरचे आरोप जोपर्यंत सिद्ध होणार नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करणार नसल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली असून दोषी नाही तर कारवाई नाही, असं म्हणत पुन्हा एकदा अजित पवारांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचं समजते. विशेष म्हणजे धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या ‘देवगिरी’ बंगल्यावर दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे देखील तिथे दाखल झाले होते. त्यामुळे अजित पवारांच्या निवासस्थानी घडामोडींचा वेग आलेला बघायला मिळाला. आता या तीनही नेत्यांमध्ये नेमके काय खल सुरु आहेत ते अद्याप गुलदस्त्यात आहेत.
गुरुवारी सुरेश धस यांनी अजित पवारांच्या भेटीची मागणी केली होत. मात्र, अजित पवारांनी ही भेट नाकारली होती. दरम्यान, देवगिरी बंगल्यावर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांसोबत झालेल्या अनौपचारिक बैठकीत अजित पवारांनी ठाम भूमिका मंडळी. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप आणि पुरावे जोपर्यंत नाहीत तोपर्यंत पक्ष कारवाई करणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
हे ही वाचा:
Kokan Hearted Girl Ankita walawalkar अडकणार विवाहबंधांत; सुरु झाली घरी लगीनघाई