बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका प्रलंबित ठेवण्याची न्यायालयाला विनंती केली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात तपास यंत्रणेला आणखी वेळ द्यावा असे म्हणत पुढील सुनावणी न घेण्याची त्यांनी विनंती केली आहे. अशातच धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयातील याचिका मागे घेतल्यावर त्यांचे वकील आणि धनंजय देशमुख यांचा एक कॉल व्हायरल झाला आहे. या व्हायरल कॉलच्या क्लिपमुळे सध्या चर्चेला उधाण आले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरु असताना मागच्या आठवड्यात एक याचिका वकील सोळंके यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली. या याचिकेमध्ये वाल्मिक कराड यांना आरोपी बनवण्यात यावं. तसेच धनंजय देशमुख यांचा राजीनामा घ्यावा आणि अशा अनेक गोष्टींचा समावेश या याचिकेत केला होता. याचिकाकर्ता म्हणून यात संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख याचं नाव होते. मात्र आज अखेर ही याचिका मागे घेण्यात आली आहे. अशा प्रकारची याचिका मला न विचारता दाखल करण्यात आल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले. या संदर्भातला वकिलाशी बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वकील सोळंके यांच्या माध्यमातून धनंजय देशमुख यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर धनंजय देशमुख यांची देखील सही होती. परंतु त्यावरील मजकूर धनंजय देशमुख यांना न विचारात वापरण्यात आला होता का अशी शंका येत आहे. माझी सही तुम्ही कशी वापरली? यातील मजकूर मला माहीत नाही. असेही धनंजय दशमुख वकीलांशी बोलताना समोर आले आहे.
हे ही वाचा:
CM Devendra Fadnavis यांचा अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम
आगामी निवडणुकींसाठी मनसे पक्षात होणार नवीन बदल; Sandeep Deshpande यांचे वक्तव्य