आज सकाळी २९ जानेवारीला प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी होऊन आतापर्यंत १७ भाविकांचा मृत्यू झाला तर शेकडो भाविक जखमी झाले. आज मौनी अमावस्येच्या दिवशी शाही स्नान करण्यासाठी गंगा किनारी प्रचंड गर्दी झाली, त्यातूनच ही चेंगराचेंगरी झाली. या दुर्दैवी घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे. मात्र आता याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांच्यासह सरकारला खडेबोल सुनावले आहे.
संजय राऊत म्हणाले की, “प्रयागराजमध्ये येणाऱ्या कोट्यावधी लोकांची सोय कशी करत होती याचा मार्केटिंग सरकार करत होतं. तेथील व्यवस्थेवर लोकं खुश नव्हती, जनतेच्या प्रतिक्रिया आम्ही तुमच्या माध्यमातून पाहत होतो. स्वतः गृहमंत्री जेव्हा कुंभमेळ्यात स्नान करून गेले, संरक्षण मंत्री जेव्हा आले, तेव्हा तो परिसर सील करण्यात आला असेल, व्हीआयपी लोक जेव्हा जातात त्या वेळेला एक दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ आणि परिसर बंद केला जातो सामान्य श्रद्धाळूसाठी त्याचा हा परिणाम असेल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतील त्या संदर्भात जे मंत्री असतील त्यांनी संबंधित मंत्र्यांनी पक्षाच्या मार्केटिंगवर लक्ष देण्यापेक्षा पक्षाच्या मताच्या लाखो श्रद्धाळू व्यवस्था करावी त्याकडे लक्ष द्यावे.आज दहा पेक्षा जास्त श्रद्धाळू यांचे प्राण गेले, त्यानंतर तातडीच्या बैठका सुरू झाल्या.”
तर धनंजय मुंडे यांच्या दिल्ली दौर्याबद्दल संजय राऊत म्हणाले की, “आपलं पद वाचविण्यासाठी धनंजय मुंडेंना दिल्लीत जावं लागतंय. त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत. पण त्यांना खुलासा देण्यासाठी दिल्लीला जावं लागतंय ही महाराष्ट्राची अवस्था आहे. ही सर्व अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची मिलीभगत आहे, कोणाचा काय संबंध आहे? हे पवार सांगणार नाहीत पण न्यायव्यवस्था सांगेल, याचा अर्थ तुम्ही पोलिसांवर दबाव आणत आहात. अप्रत्यक्षपणे न्यायव्यवस्था पोलिसांवर आणि या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून लढत आहेत त्यांच्यावर दबाव आणत आहेत”, असा टोला संजय राऊत यांनी विरोधकांवर लगावला.
हे ही वाचा :
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .