Thursday, November 30, 2023

Latest Posts

भाजपने निलेश राणेंची समजूत काढली की त्यांना समज दिली?

आधी बंड केलं आणि त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच निलेश राणेंनी निर्णय मागे घेतला, यामागे त्यांची समजूत काढण्यात आली की भाजपने त्यांना समज दिली हे तपासावं लागेल असं वक्तव्य आमदार वैभव नाईक

आधी बंड केलं आणि त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच निलेश राणेंनी निर्णय मागे घेतला, यामागे त्यांची समजूत काढण्यात आली की भाजपने त्यांना समज दिली हे तपासावं लागेल असं वक्तव्य आमदार वैभव नाईक (शश यांनी केलं. त्या आधी नारायण राणेंनीही बंड करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांनाही समज देण्यात आली होती असं ते म्हणाले. नारायण राणे गेले पाच वर्ष केंद्रात मंत्री असताना देखील या भागातील लोकांसाठी काय केलं अशी कोपरखळी राणेंना लगावला आहे.

 

माजी खासदार निलेश राणे यांच्या नाराजीनाट्यावर आणि त्यानंतर केलेल्या शक्तिप्रदर्शनावर जायंट किल्लर आमदार वैभव नाईक यांनी सडकून टीका केली आहे. निलेश राणेची समजूत काढण्यात आली की त्यांना समज देण्यात आली हे त्यांनाच माहिती आहे. याआधी नारायण राणे यांनी देखील बंड करण्याचे प्रयत्न केले त्यांना देखील भाजपकडून समज देण्यात आली. स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण आहोत का? हा प्रश्न निलेश राणेंनी स्वतः ला विचारला पाहिजे.

अवघ्या काही तासात निलेश राणेंच बंड भाजपने शमवलं, मात्र आपलेच कार्यकर्ते घेऊन त्यांनी शक्तिप्रदर्शन केले त्याला कुठलाही अर्थ नाही.

ठाकरे कुटुंबीयांवर टीका करण्यासाठी नितेश राणेंना प्रवक्तेपद
आदित्य ठाकरे यांना डिसेंबर मध्ये अटक होण्याची शक्यता असून त्याआधी ठाकरे कुटुंब लंडनला जाणार असल्याचं वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं. त्यावर वैभव नाईक यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, “गेल्या दीड वर्षात सरकार गेल्यानंतर ठाकरे कुटुंबीयांना अनेक चौकशांना सामोरे जावे लागत आहे. या सगळ्या चौकशा भाजपच्या लोकांना आधी कळतात. भाजप नेत्यांच्या घरामध्ये चौकशी समिती कार्यरत असल्यासारखे आणि ते पगार देत असतात असं काम करतात. भाजप नेत्यांना कोणाला अटक होणार, कोण जेलमध्ये जाणार हे अगोदर कळतं. आदित्य ठाकरे याचं काम भाजपला खुपत असल्याने त्यांच्यावर आरोप करून धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत.”

हे ही वाचा : 

आता ‘iPhone’ ही होणार ‘मेड इन इंडिया’ (Made in India)

संजय राऊतांनी फडणवीसांनी डिवचलं, मी पुन्हा येईल चं आम्ही सध्या स्वागत करतो कारण…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

 

Latest Posts

Don't Miss