spot_img
Friday, February 23, 2024
spot_img

Latest Posts

पुणे जिल्ह्याची विभागणी आणि शिवनेरी जिल्ह्याची निर्मिती? अमोल कोल्हे

जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या शिरूर लोकसभेतील तालुक्याच्या शाश्वत विकासावर भर देण्यात यावा अशी मागणी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे.

जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या शिरूर लोकसभेतील तालुक्याच्या शाश्वत विकासावर भर देण्यात यावा अशी मागणी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. पुणे जिल्ह्याची विभागणी केली आणि शिवनेरी जिल्ह्याची निर्मिती केली आहे. सर्व सामान्यांच्या जीवनमानावर काही फरक पडणार आहेत का ? की ही केवळ राजकीय मागणी आहे असा सवाल अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. पुणे जिल्ह्याचे विभाजन करा कारण लोकसंख्या वाढत चालली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पिंपरी चिंचवडच्या बाजूचा भागासाठी वेगळा जिल्हा निर्माण करावा आणि त्या जिल्ह्याला शिवनेरी असे नाव देण्यात यावे अशी मागणी महेश लांडगे यांनी केली आहे.

खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, जिल्ह्यासाठी खर्ची जाणारा निधी विकासासाठी वापरला जावा आणि शिवनेरी नावाला विरोध नाही फक्त मागणीमागची व्यवहार्यता तपासायला हवी असे अमोल कोल्हे यांनी सूचित केले आहे. याआधी त्यांनी बारामती जिल्ह्याची मागणी केली होती त्याचबरोबर शिरूर लोकसभेवर भाजपचा डोळा आहे. त्या अनुषंगाने शिवनेरी जिल्हाची मागणी केली जातीये की काय? याबाबतीत ही अमोल कोल्हे यांना विचारले असता त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले आहे. जिल्ह्याची मागणी करण्यापेक्षा विकासाकडे लक्ष द्या असा टोला अमोल कोल्हे यांनी लगावला आहे.

पुढे अमोल कोल्हे म्हणाले की, जुन्नरचा प्रवासी काही मिनिटांमध्येच पुण्यामध्ये पोहचू शकेल. यामुळे लोकांच्या जीवनमानात फार फरक पडणार असल्याचे कोल्हे म्हणाले त्यासोबतच हा रेल्वे मार्ग देशामधील एकमेव ब्रॉडगेजवर होऊ शकणारा प्रकल्प आहे. देशामध्ये अशा प्रकारचा प्रकल्प कोणत्याही शहरामध्ये झाला नाही. त्यामुळे आरोग्याच्या सुविधांच्या संदर्भामध्ये विचार करायला हवा. जेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री असताना दोन्ही प्रकल्पांच्या कामाला मोठ्या प्रमाणात गती देण्यात आली होती. परंतु त्यानंतर सरकार बदललं आणि हे सरकार यांसारख्या प्रकल्पावर काम करताना दिसत नाही आहेत. परंतु याच प्रकल्पामुळे मोठा विकास होणार आहे आणि अनेक लोकांना याचा फायदादेखील होणार आहे असे अमोल कोल्हे म्हणाले.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss