spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

कुत्रे इमानदार असतात, पण हे…Sadabhau Khot यांचा राऊतांवर हल्लाबोल

मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. संपूर्ण राज्यभरात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत आणि पुढे तीन दिवसांनीच म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी या निवडणुकांचा निकाल हा जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या मतदानासाठी आता अवघे १३ दिवस उरले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याला जणू युद्धभूमीचं स्वरूप आलं असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे.  तसेच प्रचार तोफांचा झंझावात सुरू झाला आहे. जोरदार प्रचार आता सगळ्याच पक्षांकडून सुरू झाले आहेत. अशातच राज्यात नवनवीन घडामोडी देखील सध्या घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र आरोप प्रत्यारोपाचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. मात्र अश्यातच बोलताना माणसाचं भान सुटलं तर जीभ घसरते. असंच काहीस महायुतीच्या सभेत जतमध्ये सदाभाऊ खोत यांच्यासोबतही झालं. आणि त्यांच्या त्याच वक्तव्यावरून मात्र अजित पवार यांनी चांगलंच फटकारलं आहे. त्यानंतर अखेर सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतु आता त्यांच्यावर सर्वांकडून टीकेची झोड होत आहे. अश्यातच संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत?

संजय राऊत यांनी आम्हाला कुत्र्याची उपमा दिली पण कुत्रे हे इमानदार असतात. ते धन्याची राखण आणि संरक्षण करतात. संजय राऊत यांनी २०१४ तसेच २०१९ ला कुणाचा फोटो गळ्यात घालून मते मागितली हे पाहावे. संजय राऊत यांनी स्वत: मध्ये ईमानदारपणा आहे का ते शोधा.

काय म्हणाले होते संजय राऊत?

ज्या माणसाने स्वतःचा चेहरा पाहावा. आपण समाजकारणात राजकारणात काय केलं मला कोणाशी व्यक्तिगत काही बोलायचं नाही. माननीय शरद पवार साहेब या देशाचे सर्वोच्च नेते आहेत. या सदा खोतच्या बापाने म्हणजे नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री यांनी बारामती जाऊन शरद पवार हे आपले कसे राजकीय गुरु आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा देश कसा घेत आहे हे वारंवार सांगितलं आहे. पवारसाहेबांचं बोट पकडून आम्ही कस राजकारण केलं हे सुद्धा मोदी यांनी सांगितलं, असं संजय राऊत म्हणालेत. सदाभाऊ खोत हा तर देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा आहे, असं संजय राऊत म्हणालेत. पवार साहेबांसारखा नेता हा राज्यात नाही तर देशाच्या राजकारणातला भीष्मपिता आहे हा आम्हाला अभिमान आहे. तुम्ही पवार साहेबांच्या आजारपणावर अशा प्रकारचा वक्तव्य करून महाराष्ट्राची मान शरमेन खाली घातली आहे. या लायकीची माणसं देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात उभी केली आहेत

Latest Posts

Don't Miss