दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. मराठी साहित्य संमेलनात आयोजित करण्यात आलेल्या ‘आम्ही असे घडलो’ या कार्यक्रमात नीलम गोऱ्हे यांनी खळबळजनक दावा केला. त्यांनी म्हंटल एका पदासाठी दोन मर्सडिज असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंवर लगावला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गट संताप व्यक्त करत आहे. संजय राऊत यांनी निलम गोऱ्हे ही निर्लज्ज, नमकहराम बाई आहे, अश्या शब्दात त्यांनी हल्लाबोल केला. आता त्यावर संजय शिरसाट यांनी संजय राऊतांना इशारा दिला आहे.
नेमकं काय म्हणले संजय शिरसाट?
तो संजय राऊत रोज बडबड करतो. त्याच्या घरावर ईडीची रेड पडलेली. 10 लाख घरी सापडले. चिठ्ठी सापडली. एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले राम मंदिरासाठी. रामाच्या नावावर दिलेले पैसे पुरले नाही. हे कसला स्वाभिमान सांगतायत. किती जरी बोललात, तरी तुमचा सगळा पिक्चर लोकांसमोर आलेला आहे.
माझ्या जिल्ह्यापुरता सांगतो. माझ्या विरोधात उमेदवार दिला. पक्षाचा एक निष्ठ असलेला कार्यकर्ता आठ दिवसांचा. आठ दिवसाच्या माणसाला तुम्ही तिकीट देता. मग तमुचे शिवसैनिक कुठे गेले होते. जे 20-25 वर्षांपासून तुमच्यासोबत काम करतायत. त्यांना तिकीट का नाकारलं? आज विचारा त्यांना तो माणसू कुठे आहे. वैजापूरमध्ये बोरनारांच्या विरोधात माणूस दिला होता. व्यापारी माणूस निवडणूक लढवली तो आता भाजपात का गेला? सिल्लोडचा उमेदवार जो भाजपत होता. निवडणुकीच्या काळात तुमच्याकडे आला, निवडणूक झाली, तो भाजपात का गेला? पैठणचा उमेदवार तो कुठे आहे? विचारा त्यांना, अशी टीका मंत्री आणि आमदार संजय शिरसाट यांनी केली. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्यावर पद मिळतं असा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला. त्यावरुन सुरु असलेल्या राजकारणावर संजय शिरसाट बोलत होते.
मराठवाड्यात अनेक ठिकाणी पैसे घेतले, तिकीटं वाटली, त्याचा परिणाम असा झाला की, जे शिवसैनिक अहो-रात्र काम करतात, ते बाजूला पडले. यात दलालांनी उखळ पाढंर करुन घेतलं. म्हणून कोणी काय केलय त्यापेक्षा तुम्ही काय करताय त्याचं एकदा स्पष्टीकरण द्या, असं मंत्री आणि आमदार संजय शिरसाट बोलले. एकनाथ शिंदे बोलतील, त्या दिवशी तुम्हाला कळेल कसे आणि कुठे-कुठे पैसे घेतलेत. या सगळ्यावर बाजू मांडताना आम्हाला सुद्धा त्रास होतो. आम्ही अभिमानाने आणि गर्वाने सांगतो की, शिवसेनाप्रमुख निवडणूक लढवताना विचाराचये बाळा तुझ्याकडे पसे आहेत का, ते विचारायचे. काही मदत लागेल का? हे सेनाप्रमुख विचारायचे. आता तिकीटासाठी पक्षाला किती पैसे देणार? म्हणून विचारणारे तयार झालेत” अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.
तुम्ही स्वत:ला मर्द समजता का?
गडाख त्यांच्या मंत्रिमंडळात तीन-चार मंत्री झाले, त्यांना विचारा. त्यांच्या वाढदिवसाला हे जायचे. आम्ही 40 वर्ष काम केलं, पण आम्हाला वाढदिवसाला साधा फोन नाही आणि यांच्या वाढदिवसाला चार्टड घेऊन जायचे असा आरोप संजय शिरसाट यांनी केला. त्या बाईच्या घरावर काही महिला पाठवून मर्दानगी दाखवता का? तुम्ही स्वत:ला मर्द समजता का? एक महिला काय बोलली, तिच्यावर तुटून पडता. आम्हाला बोलायला लावू नका. आम्ही खोलात गेलो, तर मुश्किल होईल” असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला.
कॉर्पोरेशनचे व्यवहार कसे होतात? कुठल्या हॉटेलमध्ये होतात
कॉर्पोरेशनचे व्यवहार कसे होतात? कुठल्या हॉटेलमध्ये होतात, कोण-कोण असत तोडबाजीला? या सगळ्या गोष्टी सर्वांना माहितीयत. आरोप करायला काही लागत नाही. जे सत्य आहे, ते सर्वांना मान्य करावं लागेल. आजच्या घडीला जे काय चाललय, त्यामुळे तुमचा पक्ष रसातळाला गेलाय. काल आलेला माणूस नेता होऊ शकतो, त्याला तिकीट मिळतं. पण जो शिवसैनिक तुमच्यासोबत आहे त्याला तुम्ही तिकीट देऊ शकत नाहीत, अशी खंत संजय शिरसाट यांनी व्यक्त केली.
ही वाचा:
Uddhav Thackeray : असले गयेगुजरे लोक आहेत त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही – उद्धव ठाकरेंचं उत्तर
MSRTC: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे कर्नाटक संदर्भात महत्त्वाचे आदेश
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.