मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील प्रेस क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मीट द प्रेस कार्यक्रमाला उपस्थिती लावली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलीच नागपूर प्रेस क्लब आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मी पहिल्यांदा राज्याचा मुख्यमंत्री झालो तेव्हा अनेकांच्या मनात शंका होत्या. हा मंत्रीही नव्हता, नवखा आहे, मग कारभार कसा करणार, असा प्रश्न अनेकांना पडला होता. पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना वाटायचं की सातत्याने विदर्भावरील अन्यायावर बोलणारा व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसला की आपल्यावर अन्याय केला. पण पहिल्या पाच वर्षात लोकांच्या लक्षात आले की, आपण विदर्भात खूप काम केले आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याच भागावर अन्याय होऊ दिला नाही. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात सिंचनाचे अनेक प्रकल्प पूर्ण केले. पायाभूत क्षेत्रात आपण मोठी भरारी घेतली. राज्याचा उपमुख्यमंत्री असताना आपण ऊर्जा विभागाचा २५ वर्षाचा रोडमॅप तयार केला आहे. पुढच्या दोन-तीन वर्षात अशी परिस्थिती येईल की, आपण उद्योगसहित सर्वप्रकारच्या वीजेचे दर कमी करू शकतो, अशी व्यवस्था आपण उभारली आहे,”असे महत्वाचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले, “आपण राज्यभरात सहा नदीजोड प्रकल्पाची कामे हाती घेतली आहेत. यामुळे विदर्भातील १० लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे विदर्भाचा कायापालट होणार आहे. हे प्रकल्प अनेक पिढयांवर परिणाम करणारे आहेत. गडचिरोली जिल्हा नेक्स्ट स्टील सिटी ऑफ इंडिया म्हणून उदयाला आले आहे. या भागातील नक्षलवाद कमी झाला आहे. त्यामुळे आगामी काळात विदर्भात औदयोगिक इकोसिस्टिम उभी राहील,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका