डॉ. बाबासाहेब आंबेडकर (DR. BABASAHEB AMBEDKAR) यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता तर आज देशाचे २ तुकडे झाले असते, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडले. परभणी येथे थायलंड इथल्या सहा फुट उंचीच्या पन्नास बुद्धरूप मूर्तींचे वितरण करण्यात आले. परभणीत पार पडलेल्या वैश्विक धम्मदेशनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मुस्लीम धर्माविषयी वादग्रस्त विधान केले आहे.
परभणीत गौतम बुद्धांच्या मूर्ती वितरण सोहळ्याला विजय वडेट्टीवार उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी आजच्या परिस्थितीवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराचा विषयावर त्यांनी भाष्य केले. आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर, आज देशाचे तुकडे करावे लागले असते, असं वादग्रस्त विधान केले आहे. मंदिरातील दानपेट्या काढल्या तर पुजारी पळून जातील मंदिराची देखरेखही करणार नाहीत, असेही ते यावेळी म्हणाले. विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सध्या पेटलेला आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी विजय वडेट्टीवार आवाज उठवत आहेत. अशातच आता विजय वडेट्टीवार यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
विजय वडवेट्टीवार संविधाननिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाभीमानी होते. त्यामुळे भारत देशाचा धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक अभ्यास करूनच भारत देशातील मूळ बौद्ध धम्म पुनर्जीवित करून बौद्ध धम्म स्वीकारला. वडवेट्टीवारजी, पुणे करार झाला नसता तर भारतातील बहुजनांचे चित्र खूप वेगळं असतं. तसंच तुम्ही म्हणाला होता. आम्ही ओबीसी असल्यामुळे अन्याय होतो, ही म्हणण्याची सुद्धा वेळ तुमच्यावर आली नसती. त्यामुळे, वडवेट्टीवार संविधाननिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं ऑडिट करण्याइतपत तुम्ही तत्वज्ञानी नाही हे कृपया तुम्ही ध्यानात ठेवा, अशा शब्दात सचिन खरात यांनी विजय वडेट्टीवार यांना सुनावले आहे.
हे ही वाचा:
IND vs WI 4th T-20 – टीम इंडियासमोर मालिका जिंकण्याचे आव्हान
प्रत्येक पुरुषांनीही हा चित्रपट पाहायला हवा, राज ठाकरे, १०० रुपये तिकीट