बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर बंदूक दाखवून त्याला भाईगिरीची कैप्शन देवून सोशल मीडियात दहशत निर्माण करण्याच्या घटना पाहायला मिळाल्या . खेळण्यातली बंदूक असावी असे गावठी कट्टे छोटी पोर हवेत रोखतात आणि वीडियो प्रसारित करतात. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यात एक दोन नव्हे तर तब्बल १ हजार २८१ जणांकडे शस्त्र परवाना असल्याची माहिती समोर आली. खिरापत वाटावी तसे शस्त्र परवाना बीड जिल्ह्यात देण्यात आलेत. ज्यांनी हवेत बंदूक रोखून दहशत करण्याचा प्रयत्न केला त्यांचे परवाने बीड जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द ही केले मात्र आता भाजपचेच आमदार असलेल्या सुरेश धस यांनी एक मोठा आरोप केलाय आणि त्याच कनेक्शन थेट पाकिस्तानात असल्याचं सांगितलंय.परळी ते थेट पाकिस्तान काय आहे कनेक्शन ? का मुद्दा चर्चत आला पाहूयात
सुरेश धस यांनी मुद्दा मांडला तो होणाऱ्या ड्रग्ज तस्करीचा. ही ड्रग्ज तस्करी थेट पाकिस्तानातून होत असल्याचं सांगत. गुजरातमध्ये ८९० कोटीच ड्रग्ज पकडण्यात आलं त्या प्रकरणात कृष्णा सानप आणि दत्ता आंधळे हे जेलमध्ये आहेत आणि याच आरोपींचे फोटो हे धनंजय मुंडे यांच्यासोबत आहेत. आरोपींसोबत असलेल्या फोटोंवरुन सुरेश धस यांनी धनंजय मुंडे हेच आका असल्याचा गंभीर आरोप करत होणारी ड्रग्ज तस्करी हे पाकिस्तानातून होते असा सुचक इशारा दिला. सुरेश धस यांनी जरी आरोप केला असला तरी पाकिस्तान कनेक्शन आल्याने हे गंभीर प्रार्करण असल्याची चर्चा आहे
बीड जिल्ह्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. पोलीस दल या सगळ्यांसमोर हतबल झालाय का ? असा सवाल आहे, हवेत रोखणाऱ्या बंधुका, गावठी कट्टे येतात तरी कुठून याल कोणाचं राजकीय वरदहस्त आहे का ? माणसे मारण्याची शस्त्र लहान-लहान पोरांच्या हातात बघून पोलीस ही काय कारवाई करत नाहीत. बीड जिल्ह्यात थर्मलच्या माध्यांतून आलेला पैसा, पैश्यातून तयार झालेले माफिया गँग हे सगळं डोकं बधिर करणारा आहे. पोलिसांकडे तक्रार जाण्याआधी जर आकाचा दरबार भरत असेल तर पोलीस आणि न्याय व्यवस्था बीड जिल्ह्यात आहे का? असा प्रश्न पडला आहे कारण वाल्मीक कराडचे वकील म्हणाले की न्यायालयातील खटले कमी करण्याचा काम हे वाल्मिकने केलं म्हणजे प्रति न्यायालयात वाल्मिकने सुरु केलं का? असा सवाल आता उपस्थित झालं आहे. कारण पोलिसांसह तक्रारदार पण वाल्मिक कराड बोलवून घ्यायचा त्यामुळे बीड जिल्ह्यातील पोलिस दल हा वाल्मिक कराड चालवतो का ? असाही सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे कारण परळीत येणारे गावठी कट्टे कुठून येतात याचा सामान्य माणसाला पत्ता नाहीआणि पोलिसांनाही ते शोधायचं नाही कारण यामागे राजकीय वरदहस्त आहे का? हा प्रश्न आहे?
संतोष देशमुख हत्या प्रकरण हे जरी निमित्त असल तरी बीड जिल्ह्यात चाललंय काय. होणाऱ्या घटनेनं बीड जिल्ह्याला शरमेने मान खाली घालायला लागली आहे. गुन्हेगारीचा अड्डा कोणी तयार केला, संघटित गुन्हेगारी का फोफावली, मोक्का लावूननही गुन्हेगार गुन्हेगारी करत असतील तर कायद्याच काय? हा सवाल आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात ७ आरोपींवर मोक्का लावला आहे. मात्र आता मागणी होत आहे ती म्हणजे वाल्मीक कारडवर मोक्का लावा. या प्रकरणात अजूनही कृष्णा आंधळे फरार आहे. वाल्मीक कराड हा फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आहे मात्र हत्या प्रकरणात अजूनही पुरावे नसल्याने गुन्हा दाखल नाही.
बीड जिल्हा गावठी कट्टा युक्त झाला आहे. टपरीवर पान मिळावं तस गावठी कट्टे पाहायला मिळतात. अंजली दमानिया यांनी बेकायदेशीर शास्त्र परवाना बीड जिल्ह्यात देण्यात आले असा आरोप त्यांनी केला आहे. सध्यातरी पोलिसांकडून कारवाई सुरू असली तरी गावठी कट्टे जिल्ह्याची हद्द ओलांडून येतातच कसे ? जिल्हा पोलिसांच गुप्तचर खात काय करत आहे? की गावठी कट्टे जिल्ह्यातच तयार होतात हा मुद्दा आता निर्माण झाला आहे.
सुरेश धस दिवसांदिवस आरोपांच्या फैरी झाडत आहेर. बीडचा बिहार झालं आहे ते थेट ड्रग्ज कनेक्शन पाकिस्तान ते गुजरात आणि आरोपींचे फोटो धनंजय मुंडे यांच्यासोबत असल्याने सुरेश धस यांनी मुंडेंची अडचण केली आहे. मात्र राज्यात सरकार भाजपसह महायुती सरकार आहे आणि धस भाजपचे आमदार आहेत, मुख्यमंत्र्यांना सांगून गावठी काट्यांचा बंदोबस्त लावतात का हे पहाण महत्वाचं आहे.