Friday, April 26, 2024

Latest Posts

“त्या” मागण्यांमुळे उद्धव ठाकऱ्यांना जावे लागणार नव्या संकटाला सामोरे

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात आणखी एक महत्त्वाचा ट्विस्ट आला आहे. महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुका या तोंडावर आल्या आहेत आणि त्यामुळे प्रत्येक पक्षात जागा वाटपाची तयारी जोरात सुरु झालेली आहे.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात आणखी एक महत्त्वाचा ट्विस्ट आला आहे. महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुका या तोंडावर आल्या आहेत आणि त्यामुळे प्रत्येक पक्षात जागा वाटपाची तयारी जोरात सुरु झालेली आहे. त्यामुळे प्रत्येकाला उत्सुकता आहे की कोणाला कोणते पद दिले जाणार आहे अथवाअ मिळणार आहे. जागावाटप संदर्भात खासदार संजय राऊत यांच्यांकडून दावा केला जात आहे. त्या दाव्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोध केला जात आहे. खासदार राऊत यांच्या दाव्यानुसार महाविकास आघाडीतील १९ पेक्षा जास्त जागा ठाकरे गट लढवणार आहे. यावरुन महाविकास आघाडीत मतभेद होत आहेत. असा चर्चाना उधाण आलेले आहे. आणि त्यामुले कदाचित उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याचे चिन्ह दिसत आहे.

शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला नंतर शिवसेनेचे दोन गट तयार झाले. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि त्यांनी पुकारलेले बंड आणि भाजपला सोबत धरून ट्यान्कझे पारडे हे नक्कीच तोलाचे झाले आहे. तर शिवसेनेने थेट संभाजी ब्रिगेडसोबतच युती केली. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती ही राजकीय गरज असल्यामुळे झाली आहे.हे सर्वानाच माहित आहे. यामुळे मराठा मते सेनेकडे वळवण्यासाठी याचा निश्चितच फायदा होणार आहे. असे असले तरी देन्ही गटाने किमान समान कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे.शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांची युतीची घोषणा होऊन सात आठ महिने झाले. परंतु अद्याप संभाजी ब्रिगेडला महाविकास आघाडीत स्थान मिळाले नाही. आता संभाजी ब्रिगेडने नवीन मागणी केली आहे. शिवसेना (Shivsena) आणि संभाजी ब्रिगेड या दोन पक्षांनी एकत्र येणार असल्याचे निर्णय मागील वर्षी जाहीर केले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेड यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. आता या घोषणेला सात ते आठ महिने झाले आहेत. परंतु अजूनही संभाजी ब्रिगेडला महाविकास आघाडीत घेतले गेले नाही. त्यावर फक्त शिवसेना ठाकरे गटाकडून चर्चा केली जात आहे. आता संभाजी ब्रिगेडने केलेल्या मागणीवरुन उद्धव ठाकरे यांच्यापुढे नवे संकट निर्माण झाले आहे.

संभाजी ब्रिगेडने उद्धव ठाकरे यांच्या समोर काही मागणी केल्या आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे टेन्शन काही अंशी वाढले आहे. लोकसाबभेच्या निवडणूक या तोंडावर असतानाच संभाजी ब्रिगेडने सुद्धा लोकसभा निवडणुकीता मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजी ब्रिगेडकडूनही लोकसभेच्या तीन जागांची मागणी करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडकडून पुणे. हिंगोली आणि बुलढाण्याच्या जागांची मागणी ठाकरे गटाकडून केली आहे. दोन किंवा तीन जागांवर लोकसभा उमेदवार उभे करण्याचे धाडस संभाजी ब्रिगेड करून करण्यात येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या तीन जागा संभाजी ब्रिगेडला देण्याची मागणी केली गेली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्यांकडे तीन जागांची मागणी केल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी दिली. यामुळे उद्धव ठाकरे यांच्यापुढे आता महाविकास आघाडी आणि युती टिकवण्याचे आव्हान आहे. त्यासाठी त्यांना मोठी तडजोड करावी लागणार आहे.

हे ही वाचा:

१२ वी नंतर करा हा कोर्स; प्रवेश प्रक्रियेपासून करिअरच्या संधी पर्यंत मिळवा संपूर्ण महिती

कोणाला मिळणार मंत्रिपद? मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? आमदारांनी मुंबई गाठली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss