Thursday, November 30, 2023

Latest Posts

ईडीकडून ठाकरे गटाचे आमदार ‘रवींद्र वायकर’ यांच्यावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

ईडीकडून ठाकरे गटाचे आमदार 'रवींद्र वायकर' यांच्यावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

ईडीने पुन्हा एकदा देशभरात जोरदार कारवाई सुरु केली आहे. दिल्लीपासून मुंबई ते राजस्थानपर्यंत ईडीने छापेमारी चालू केली आहे. या छापेमारीत शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का मिळण्याची शक्यता आहे कारण शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात ईडीने गुन्ह दाखल केला आहे. बेकायदेशीरपणे हॉटेल बांधल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर राजस्थानच्या जयपूरमध्ये जल जीवन मिशन घोटाळ्याप्रकरणी ईडीने डझनभर ठिकाणी छापेमारी केलेली आहे. दिल्ली सरकारमधील असणारे मंत्री राजकुमार आनंद यांच्या घरी देखील ईडीने रात्रभर छापेमारी केली आहे.ईडीने अनेक ठिकाणी छापेमारी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ईडीने आमदार रवींद्र वायकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीरपणे हॉटेल बांधल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. जोगेश्वरी येथे पंचतारांकित हॉटेल बांधण्यासाठी रवींद्र वायकर यांनी पालिकेचा भूखंड हडप केल्याचा आरोप असून हा ५०० कोटींचा कथित घोटाळा असल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणी रवींद्र वायकर यांना ईडीकडून चौकशीला बोलावलं जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

वायकर यांच्या पत्नीवरही गुन्हा दाखल

ईडीने या पंचतारांकित हॉटेलशी संबंधित कागदपत्रे मागवले आहेत. ईडीच्या इकनॉमिक ऑफेन्स (Economic Offence) विंगने या पूर्वी रवींद्र वायकर यांची चौकशी केली होती. आता ईडीने वायकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने वायकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

ईडीने दिल्लीतही मोठी कारवाई केली आहे. दिल्लीतल्या केजरीवाल सरकारमधील असणारे मंत्री राजकुमार आनंद यांच्या घरी ईडीने छापेमारी केली होती. ही छापेमारी जवळ जवळ २३ तास चालू होती. ईडीचे अधिकारी गुरुवारी संध्याकाळी ६ वाजता राजकुमार यांच्या घरी पोहोचले व रात्रभर तपासणी केल्यानंतर पहाटे ४:३० वाजता ईडीचे अधिकारी त्यांच्या घरातून माघारी फिरले. आम्हा विरोधकांना त्रास देण्यासाठी ईडीचे अधिकारी घरी आले होते. त्यांना या छापेमारीत काहीच सापडलेलं नाही, “आम्हाला वरून आदेश आहे त्यामुळे आम्ही थांबलोय, जेव्हा आम्हाला पुढचा आदेश येईल तेव्हा निघून जाऊ”, असं हे अधिकारी म्हणत होते, असा दावा मंत्री राजकुमार आनंद यांनी केला आहे.

हे ही वाचा : 

मला गंभीर वातावरणात राहायला आवडत नाही, पण..”,एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया

रोहित पवारांची ‘संघर्ष यात्रा’ पुन्हा सुरु होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss