spot_img
spot_img
Friday, September 22, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष Jayant Patil यांना ईडीची नोटीस

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ही समोर येत आहे. एकीकडे सत्तासंघर्षाच्या निकाल हा आज लागणार आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ही समोर येत आहे. एकीकडे सत्तासंघर्षाच्या निकाल हा आज लागणार आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे (National Congress Party) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. शातच जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.

सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश नोटीशीतून देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएस (IL & FS) प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस धाडल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज निकाल येणार आहे, आणि त्याच्या काही तास आधी जयंत पाटील यांना नोटीस मिळते, हा योगायोग समजायचा की आणखी काय,हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.

आयएल आणि एफएस (IL & FS) या कंपनीच्या व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू होती. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. याआधीही या कंपनी प्रकरणी राज ठाकरे यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती. आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकऱणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे. ईडीने नोटीस पाठवल्याच्या वृत्तावर जयंत पाटील यांनी मात्र अद्याप अशी कोणती नोटी मिळाली नसल्याचं म्हटलं आहे.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss