spot_img
Saturday, March 22, 2025

Latest Posts

एकनाथ शिंदे फडणवीसांच्या बैठकीला गैरहजर; नेत्यांच्या भुवया उंचावल्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुपस्थिती दर्शवली. देवेंद्र फडणीवस यांनी नगरविकास विभागाशी संबंधित बैठकीलाच शिंदे अनुपस्थित राहिल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीविषयी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याआधी एक मंत्रिमंडळ बैठक तसेच १०० दिवसांच्या आढावाच्या बैठकीलाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित होते. आता काल झालेल्या बैठकीत देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. कालच्या बैठकीत पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या क्षारांच्या विकास पराधिकारणाची बैठक दुपारी १ वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. तर दुपारी १२:३० विजय नगरविकास विभागाअंतर्गत येणाऱ्या नाशिक महापालिका सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाबाबतही बैठक होती. या बैठक नगर विकास खात्याशी संबंधित होत्या. मात्र शिंदेच्या दांडीने नेत्यांनी पुन्हा एकदा भुवया उंचावल्या आहेत.

कोणत्या कारणांमुळं अनुपस्थित
शहरांशी संबंधित विकास प्राधिकरणे नगरविकास विभागाअंतर्गत येतात आणि एकनाथ शिंदे हे या खात्याचे मंत्री असल्याने त्यांची उपस्थिती आवश्यक होती. त्याचबरोबर बैठकीचा निरोप एकनाथ शिंदेंना मंगळवारी दुपारी मिळाला. परंतु आपले पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या बैठकांना अनुपस्थित राहिल्याचे सांगितले जात आहे. या बैठकांना न जाता शिंदे मलंगगड उत्सवास उपस्थित राहिले होते.

उदय सामंत यांनी पत्राद्वारे व्यक्त केली नाराजी
शिंदेसेनेचे काही आमदार मंत्री अनेक कारणांवरून नाराज आहेत, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहेत, अशातच उद्योग खात्यातील अनेक निर्णय प्रशासकीय पातळीवर परस्पर घेतले जात असल्याने मंत्री उदय सामंत यांनी खात्याचे प्रधान सचिव आणि ‘एमआयडीसी’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री म्हणून आपल्या अधिकारांवर गदा येत असून महत्त्वाच्या बाबी व निर्णयांचे प्रस्ताव आपल्या संमतीसाठी ठेवावेत, अशा सूचना सामंत यांनी दिल्याची माहिती आहे. त्याचबरोबर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना अंधारात ठेवून व त्यांच्याकडे कार्यभार न देता एसटीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार परिवहन खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे देण्यात आला आहे. यासह अन्य मुद्द्यांवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीतच नाराजी व्यक्त केली होती, त्याचबरोबर पालकमंत्री पदाचा प्रश्न देखील अद्याप सुटला नसल्याने काही आमदारांमध्ये नाराजीचा सुर आहे.

या पार्श्वभूमीवर नगरविकास खात्याशी संबंधित बैठकीला शिंदे अनुपस्थित राहिल्याची चर्चा आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह संबंधित मंत्री, पालकमंत्री या बैठकांना उपस्थित होते. त्यामुळे शिंदेंची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली आहे.

हे ही वाचा:

Rajan Salvi Resigned: ठाकरेंच्या निष्ठावान शिवसैनिकांमध्ये असणाऱ्या राजन साळवींचा राजीनामा: उद्धव ठाकरेंना रामराम

Kokan Hearted Girl Ankita walawalkar अडकणार विवाहबंधांत; सुरु झाली घरी लगीनघाई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss