spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

Eknath Shinde Ajit Pawar: तुम्हाला तुमची खुर्ची फिक्स ठेवता आली नाही, मी काय करु- अजित पवार

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर काल (२ मार्च) महायुती सरकारची पत्रकार परिषद पार पडली. यात मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांनी विरोधकांवर सडकून टीकाही. त्यातच आता तुम्हाला तुमची खुर्ची फिक्स ठेवता आली नाही, मी काय करु...; असे अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना कोपरखळ्या मारत टोला लगावला.

Eknath Shinde Ajit Pawar: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर काल (२ मार्च) महायुती सरकारची पत्रकार परिषद पार पडली. यात मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांनी विरोधकांवर सडकून टीकाही. त्यातच आता तुम्हाला तुमची खुर्ची फिक्स ठेवता आली नाही, मी काय करु…; असे अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना कोपरखळ्या मारत टोला लगावला.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget Session 2025) आजपासून (३ मार्च) सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात असलेल्या महायुती सरकरचा हा पहिला अर्थसंकल्प आहे.राज्यातील विविध मुद्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक सज्ज आहेत. तर विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनीही कंबर कसली आहे. हे अधिवेशन संपूर्णपणे चार आठवडे चालणार आहे. त्यापूर्वी काल चहापानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता, मात्र विरोधकांनी त्यावर बहिष्कार टाकला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काल संध्याकाळी पत्रकार परिषदही पार पडली, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. याचवेळी महायुतीच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोरच एकमेकांना टोला लगावला. एकनाथ शिंदेंनी केलेल्या विधानानंतर अजित पवारांनीही त्यांना मिश्किल शब्दांत उत्तर दिलं, त्याचीच सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.

अर्थमंत्री म्हणून अजित पवार (Ajit Pawar) अर्थसंकल्प कसा मांडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. जरी या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होणार नसल्या तरी विधानसभा निवडणुकीत केलेल्या घोषणा चालू ठेवाव्या लागणार आहेत. शिवाय जुन्या योजना सुरु ठेवत अर्थिक तूटही भरुन काढावी लागणार आहे. सोबतच खर्चाला अर्थिक शिस्तही लावावी लागणार आहे. कारण राज्यातील विकासकामे करणा-या कंत्राटदारांची जवळपास ८० हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासमोर अर्थसंकल्प मांडताना मोठी आव्हानं असणार आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर काल (२ मार्च) महायुती सरकारची पत्रकार परिषद पार पडली. यात विरोधकांवर सडकून टीकाही करण्यात आली. एकमेकांना कोपरखळ्या मारत या महायुतीच्या पत्रकार परिषदेची सुरुवात झाली. अजित पवारांनी आपली खुर्ची फिक्स केल्याची मिश्किल टीप्पणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या स्टाईलने उत्तर दिलं. तुम्हाला तुमची खुर्ची फिक्स ठेवता आली नाही. त्याला मी काय करु, असा प्रतिटोला अजित पवारांनी लगावला. यानंतर आमची फिरणारी खुर्ची आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.

मी व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोणतेही ‘शीतयुद्ध’ नसल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केलं. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवेदनानंतर एकनाथ शिंदेंनी बोलण्यास सुरूवात केली.”सरकारची नवी टर्म असली, तरी आमची टीम जुनीच आहे. फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची अदलाबदल झालेली आहे, असं एकनाथ शिंदे (फडणवीसांकडे बोट दाखवत) म्हणाले. अजितदादांची मात्र फिक्स आहे. दादांचं बरं आहे,नो टेन्शन.” अशी टिप्पणी शिंदे यांनी केली. त्यांचं हे विधान ऐकून फडणवीस आणि अजित दादा दोघांनाही हसू आवरलं नाही.

हे ही वाचा:

Maharashtra Assembly Budget Session 2025 : ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता; विधिमंडळाकडून महत्त्वाची अपडेट

Skin Care: पिंपल्सच्या समस्येपासून सुटकारा; गुलाब पाण्यात मिसळा ‘या’ गोष्टी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss