Tuesday, April 23, 2024

Latest Posts

मुंबईमधील युवा कौशल्याच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे हजेरी

मुंबईमधील युवा कौशल्याच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित होते तेथे ते युवा शक्ती करियर शिबिराचा उद्धघाटन करण्यात ते आले होते.

मुंबईमधील युवा कौशल्याच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित होते तेथे ते युवा शक्ती करियर शिबिराचा उद्धघाटन करण्यात ते आले होते. जे पी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी भाषण केले. तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये बोलताना ते म्हणाले की, मोदी सरकारने सुद्धा युवा शक्तीची टाकत ओळखली आहे. आणि आपल्या युवापिढीचे धुरागस आपला देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था देखील ११ व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणण्याचे मोठे काम केले आहे. सध्याच्या परिस्तिथीमध्ये मोठं मोठ्या आर्थिक व्यवस्था ढासळत असताना हे काम कारण कठीण आहे. जे. पी म्हणजे जुबां के पक्के असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांचे कौतुक केले. पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, युवा शक्ती करियर शिबीराचे उघटन जे.पी नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले आहे. उद्या आपल्या भारताचे देशाचे जे भवितव्य जे आहे भविष्य जे आहे ते तुमच्या हातात आहे. म्हणून मोदी साहेब या तरुण पिढीला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला देखील त्यांनी अनेक उपक्रम देखील त्यांनी सुरु केले आहेत. तरूणानाच्या हाताला काम मिळाले पाहिजे त्यांच्या डोक्याला चांगले विचार दिले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने समाजामध्ये प्रगती होत असते म्हणूनच राज्यशासनाच्या प्रत्येकाला रोजगार या धोरणापासून हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. आजचे हे शिबीर नव्या पिढीसाठी हे खूपच महत्वाचे आहे.

कुशल महाराष्ट्र रोजगार युक्त महाराष्ट्र घडवण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्दोजकता, नाविन्यता अमलात आणण्याच्या अंतर्गत हे पॉल जे टाकलेले आहे राज्यामधील सर्व ३६ जिल्ल्यांमध्ये २८८ मतदार संघामध्ये विद्यार्थ्यांसाठी अशी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, परंपरागत शिक्षणाशिवाय विविध प्रकारचे कोर्सेस आपल्याकडे उपलब्ध आहेत. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले आहे. मोदींच्या नेतृत्वात भारत पुढे जात आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या शिबिरांमधून विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss