Eknath Shinde Delhi Meeting: मुंबईसह संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुका या पार पडल्या. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकांचा निकाल हा आपल्या सर्वांच्या समोर आला. आणि यामध्ये महायुतीचा दमदार असा विजय झाला. यानंतर मुख्यमंत्री कोण होणारे याबाबतचे चित्र काही स्पष्ट होण्याचे नाव घेत नाही. आज निकाल लागून ६ दिवस होत आले पर्णातू अजूनही मुख्यमंत्री कोण असणार याबाबत अनेक प्रश्न हे उपस्थित होत आहेत. परंतु सध्या चालू असणाऱ्या घडामोडींमुळे काही वेगळेच निष्कर्ष समोर येत आहेत. अश्यातच काल दिल्लीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली त्यानंतर सोशल मीडियावर एक गोष्ट ठळक पणे दिसून आली आणि त्यामुळे चर्चेला आता चांगलंच उधाण आलं आहे. याबाबतच सविस्तर जाणून घेऊया.
महायुतीचे सरकार विजय झाल्यानंतर गुरुवारी दिनांक २८ नोव्हेंबर रोजी दिल्लीत रात्रीच्या सुमारास एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि जेपी नड्डा उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्ली निवासस्थानी रात्री १०.३० ते १२ वाजेपर्यंत ही संपूर्ण बैठक सुरू होती. त्या संपूर्ण बैठकीत महायुतीच्या नेत्यांमध्ये राज्यातील पुढील मुख्यमंत्री कोण होणार आणि खातेवाटपंच्या दृष्टीने सविस्तर चर्चा झाली असे सध्या समोर येत आहे. परंतु याबैठकीत अनेक गोष्टी या समोर आल्या आहेत.
या बैठकीला देवेंद्र फडणवीस हे नेहमीपेक्षा वेगळ्या पेहरावात आले होते. राज्याचा नवा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होण्याची आता केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे. काल दिल्लीतील बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि हास्य बरेच काही सांगून जाणारे होते. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांचा चेहराही उत्साहाने ओसंडून वाहत होता. पण याउलट काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या चेहऱ्यावर मात्र चिंतेची काजळी दाटल्याचे दिसून आले. या गोष्टीची सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा सुरु आहे.
एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होण्यास इच्छूक होते. मात्र, भाजपने ही मागणी मान्य न केल्याने एकनाथ शिंदे नाराज झाले आहेत का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. अन्यथा दिल्लीतील इतक्या महत्त्वाच्या बैठकीत एकनाथ शिंदे हे इतके हताश का दिसले असते? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. तसेच या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या हताश बॉडी लँग्वेजसोबत आणखी एक गोष्ट अनेकांच्या नजरेत भरणारी ठरली. ती म्हणजे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर दिल्लीतील बैठकीचा एकही फोटो टाकलेला नाही. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटला तत्परतेने अमित शाह यांच्याकडून पुष्पगुच्छ घेतानाचा फोटो शेअर केला. पण एकनाथ शिंदे यांनी अद्याप अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीचा एकही फोटो सोशल मीडियावर टाकलेला नाही. एरवी एकनाथ शिंदे त्यांचा कार्यक्रम, सभा आणि गाठीभेटींचे फोटो तत्परतेने सोशल मीडियावर टाकतात. मात्र, संपूर्ण रात्र उलटून गेल्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील बैठकीचा एकही फोटो शेअर केलेला नाही. या गोष्टीचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
हे ही वाचा:
Time Maharashtra आयोजित Strawberry With CM कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंनी साधला शेतकऱ्यांशी संवाद
स्ट्रॉबेरी पिकाला अनुदान देण्यासाठी शासन प्रयत्नशील – CM EKNATH SHINDE
Follow Us