spot_img
spot_img

Latest Posts

तलाठी पेपर भरती प्रकरणानंतर एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये

राज्यात सध्या तलाठी भरतीच्या परीक्षा सुरु आहेत. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत या परीक्षा संपतील. पण या परीक्षा सुरु झाल्यापासून वादात सापडल्या आहेत.

राज्यात सध्या तलाठी भरतीच्या परीक्षा सुरु आहेत. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत या परीक्षा संपतील. पण या परीक्षा सुरु झाल्यापासून वादात सापडल्या आहेत. काही ठिकाणी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेला उशिर झाला. काही ठिकाणी पेपर फुटीचा प्रकरण समोर आला. काही लोकांकडे प्रश्नपत्रिकाच आढळली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. आता याच प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. पेपर फुटी प्रकरणात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, तसेच तलाठी परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. असं असताना या पेपर फुटीच्या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.

तलाठी पेपर भरती प्रकरणानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडवर आहेत. या प्रकरणातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई केली जावी यासाठी वरिष्ठ पातळीवर सूत्रे हलत असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पेपर फुटी प्रकरणावर चौकशी करण्यासाठी दोन विशेष ओएसडी अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहिती समोर येत आहे. आमदार बच्चू कडू यांची आज मुंबईत एमपीएससीच्या समन्वयकांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागाच्या होत असलेल्या परीक्षांची फी कमी करण्यात यावी, या विषयावर चर्चा झाली. राज्य सरकार या संदर्भात सकारात्मक असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तलाठी पेपर फुटीसंदर्भात कडक कायदे करणार, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

दरम्यान, बच्चू कडू यांनी पेपरफुटी प्रकरणावर याआधीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. खून करणाऱ्याला जशी मृत्यू दंडाची शिक्षा केली जाते अगदी त्याच धर्तीवर किंवा तशीच कठोर शिक्षा पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना देण्यात यावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांची मुलं या भरतीसाठी प्रयत्न करतात. त्यामुळे पेपरफुटीतून या शेतकऱ्याच्या मुलांची संधी हिसकावली जात असल्याचीदेखील प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली होती.

हे ही वाचा:

देशाच परिवर्तन करण्यासाठी ही आघाडी मजबूत असणार, शरद पवार

माविआ पत्रकार परिषद LIVE : आम्ही हुकूमशाहीच्या विरोधात , उद्धव ठाकरे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss