Friday, March 29, 2024

Latest Posts

गेल्या अडीच वर्षात कोमात गेलेलं सरकार १० महिन्यात जोमाने काम करताना दिसतंय – एकनाथ शिंदे

शासकीय कार्यालयात जाऊना जनतेचे हेलपाटे वाचावे यासाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेची निर्मिती केली आहे. त्याचप्रमाणे या संकल्पनेतून नोकरीच्या संधी , रोजगाराच्या संधी, आरोग्यविषयक गोष्टींचा लाभ घेता येईल याची तरतूद करण्यात आली आहे.

शासकीय कार्यालयात जाऊना जनतेचे हेलपाटे वाचावे यासाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेची निर्मिती केली आहे. त्याचप्रमाणे या संकल्पनेतून नोकरीच्या संधी , रोजगाराच्या संधी, आरोग्यविषयक गोष्टींचा लाभ घेता येईल याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच या संकल्पनेची सुरवात शंभूराज देसाई यांच्या पाटण या तालुक्यातून करण्यात आली आहे याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून जनतेला याचा जास्तीत जास्त फायदा मिळेल. पत्रकारांकडून कर्नाटक निवडणूक निकालासंबंधी एकनाथ शिंदे याना विचारणा केली असता, भाजप आहे आमचा मित्र पक्ष असून जनतेच्या निर्णयाचा आदर करणार आमचा पक्ष असला कारणाने आम्ही त्यांच्या निर्णयाचे समर्थन करो असे मत यावेळी एकनाथ शिंदे यांनी मांडले. त्याचबरोबर शरद पवार यांनी केलेल्या दाव्यावर एकनाथ शिंदे यांनी त्यांना चांगलाच टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे यांनी फोडाफोडीच्या स्जकरणावरून एकाच राज्याचं निकालावर सगळं काही अवलंबलेले नसते असे स्पष्टच मत यावेळी व्यक्त केले. २०१९ ला झालेल्या निवडणुकांवर भाष्य करत थाम्बपिंग मेजॉरिटी (thumping mejority) च्या निकषावर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणूक जिंकली होते हे सुद्धा नाकारता येणार नाही. हे देखील विरोधी पक्षाने लक्षात घेतले पाहिजे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो का तोडो यात्रेचा उल्लेख करत त्रिपुरा , नागालँड , मेघालय या तीन राज्याच्या निवडणूक भाजपने जिंकल्या आहेता. त्यामुळे एका राज्याची निवडणूक तेथील मतदार संघ आणि तेथील प्रश्न या सगळ्या बाबींचा विचार करून तेथील जनता हि त्यांचा कौल देत वाजते. आणि या सर्वांचा विचार करून त्या एक मार्यातीत राज्याचा निकाल लागून त्याचा परिणाम हा देशाला करून घेऊ नये असे मत एकनाथ शिंदे यांनी केले आहे. आणि स्वतःचा स्वतःला शाबासकी देण्यासारखं आहे असे स्पष्ट मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. त्यामुळे या निवडणुकीचा परिणाम हा विधानसभेच्या निवडणुकीवर नक्कीच होणार आहि असा आत्मविश्वास एकनाथ शिंदे यांनी दाखवला. महाराष्ट्राबद्दल बोलत असाल तर महाराष्ट्राने गेल्या अडीच वर्षात कोमात गेलेलं सरकार हे महाराष्ट्राने बघितलेले आहे त्यामुळे माझी तर खात्री आहे महाराष्ट्र या सरकारला घेऊन निशचिंत आहे. दहा महिन्यात घेतले निर्णय हे जनतेच्या भल्याचेच घेतले आहेत आणि आपली जनता हि सुज्ञ आहेत त्यामुळे आमचा जनतेवर पूर्ण विश्वास आहे.

उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर दुसऱ्याचं घर जळत असताना आपलं घर जळतंय याचा विचार आधी करायला हवा आणि त्यानंतर दुसऱ्याच घर जळतंय हे बघताना त्याचा आनंद घ्यावा अशीखोचक टीका एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. उद्धव ठाकरे हे असुरी आनंद घेतात. हिंदी म्हणीचा वापर करून उद्धव ठाकरेंकवर सडकवून टीका केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली जनता हि काम करणाऱ्या आणि नेहमी पाठीशी असणाऱ्या लोकनिधींवर विश्वास ठेवते त्यामुळे मला माझ्या महाराष्ट्रातील जनतेवर पूर्ण विश्वास आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदे LIVE : शासन आपल्या दारी या संकल्पनेची सुरवात

Karnataka निकालानंतर Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया, सरकार कायम बदलत असतं

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss