महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली आहे तर या विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं आहे. या यशात भाजपला सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या आहेत. तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला ५७ जागा मिळाल्या आहेत आणि अजित पवारांच्या ४१ मिळाल्या आहेत. आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? अजित पवारांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आमची हरकत नाही असं म्हंटल आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार का देवेंद्र फडणवीस हा पेच महायुतीमध्ये कायम आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली असल्याची गुगली टाकल्यामुळे महायुतीपुढे नवा पेच निर्माण झाला आहे.
एका वृत्तपत्रकाच्या माहितीनुसार, भाजपकडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या मोबदल्यात केंद्रात महत्त्वाच्या खात्याचे मंत्रिपद किंवा राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्याचा पर्याय ठेवला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी हे दोन्ही पर्याय नाकारल्या आहेत. त्याऐवजी एकनाथ शिंदे यांनी एक नवा प्रस्ताव भाजपासमोर ठेवला आहे. मला राज्यात उपमुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर मला महायुतीला सरकारचा संयोजक हे पद द्यावे. कारण राज्यातील विधानसभा निवडणूक ही माझ्या नेतृत्त्वाखाली लढवण्यात आली होती, असे एकनाथ शिंदे यांचे मत आहे. तसेच आपला मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या या मागणीने भाजप आणि महायुतीचे नेते पेचात पडले आहेत. भाजपने अजूनही या प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आधीच भाजपच्या राजकीय वर्तुळात खल सुरु असून त्यामुळेच महायुती सरकारच्या शपथविधीला उशीर होत असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार असले तरी श्रीकांत शिंदे यांना थेट उपमुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांना कितपत रुचणार हे आता बघावे लागणार आहे.
हे ही वाचा:
राजभवनातून बाहेर पडल्यावर Deepak Kesarkar यांची प्रतिक्रिया; म्हणाले,”नवीन सरकार लवकरच…”